नांदेड येथे उद्या दि. 26मे दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंख नाद जाहीर सभा! : प्रशासनाची जय्येत तयारी:व्ही.आय पी.रोडवर दिव्यांची रोशनाई: सभेसाठी १२ पार्किंग स्थळें
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड
*नांदेड येथे उद्या दि. 26मे दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंख नाद जाहीर सभा! : प्रशासनाची जय्येत तयारी:व्ही.आय पी.रोडवर दिव्यांची रोशनाई: सभेसाठी १२ पार्किंग स्थळें*
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड:दि.25/5/2025-
केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा दिनांक 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून शहरातील नवा मोंढा येथे दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आले आहे तसेच भाजपाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या भाग्यनगर आनंदनगर रोडवरील विद्युत नगर भागातील साई कॉम्प्लेक्स येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी ते जाहीर सभेसाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानीक भाजपाचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने सभेसाठी जय्यत तयारी केली आहे
सोमवार, दि. २६ मे रोजी दुपारी २ वाजता नवा मोंढा, मैदान नांदेड येथे आयोजित केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या शंखनाद भव्य जाहीर सभेसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाने शहरात १२ पार्किंग स्थळे उभारली आहेत.
भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या या जाहीर सभेसाठी जिल्हाभरातून मोठ्या
प्रमाणात कार्यकर्ते व वाहने येण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा व पोलीस प्रशासनाने नांदेड शहरात पार्किंगची व्यवस्था केली आहे. यामध्ये यशवंत महाविद्यालयाचे मैदान येथे भोकरकडून येणारी दुचाकी व चार चाकी वाहने, महात्मा फुले शाळेचे मैदान येथे नांदेड शहरातील सर्व दुचाकी वाहने, जाधव पार्किंग (दांतीवाला पेट पंप) येथे नायगाव व देगलूरकडून येणारी दुचाकी व चार चाकी वाहने, २६
नंबर रोड येथे सर्व दुचाकी वाहने, शासकीय तंत्रनिकेतन मैदान येथे परभणी, लातूर आणि वसमतकडून येणारी चार चाकी वाहने, स्टेडियम रोड पार्किंग (गोकुळनगर) येथे सर्व दुचाकी वाहने, स्टेडियम ग्राऊंड पार्किंग (इंदिरा गांधी मैदान, गोकुळनगर) येथे दुचाकी व चारचाकी वाहने, खालसा हायस्कूल येथे चारचाकी वाहने व बसेस, हिंगोली गेट फटाका ग्राऊंड येथे सर्व प्रकारची वाहने,
हनुमानगडचे मैदान येथे मुदखेड व अर्धापूरकडून येणारी सर्व वाहने, एमजीएम कॉलेजचे मैदान येथे मुदखेड, अर्धापूर येथून येणारी सर्व प्रकारची वाहने तर राजर्षि शाहू विद्यालय येथे दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या जाहीर सभेत सहभागी होणारे नागरिक व कार्यकत्यांनी या पार्किंग स्थळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान व्ही.आय. पी.रोड वर सौर ऊर्जा दिवे बसविण्यात आले असून रस्तयावरिल खड्डे बुजवूण रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. सभेसाठी नांदेड पोलिस यांसह सी.आर पी.एस. आर.पी. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.