महाराष्ट्रातील छोट्या गटातील प्रख्यात पैलवान निखिल माने याला जावळीच्या विघ्नेश वांगडे यांनी दोन मिनिटात दाखवले अस्मान
आपल्या जावली तालुक्यात एक सुसज्ज तालीम असावी:शामबाबा धनावडे.

महाराष्ट्रातील छोट्या गटातील प्रख्यात पैलवान निखिल माने याला जावळीच्या विघ्नेश वांगडे यांनी दोन मिनिटात दाखवले अस्मान
आपल्या जावली तालुक्यात एक सुसज्ज तालीम असावी:शामबाबा धनावडे.
एम.जे.न्युज. सातारा.विद्याधर धनावडे.
मेढा.दि.1काल वालुत गावच्या यात्रेनिमित्त झालेल्या मोठ्या मैदानात अतिशय नामांकित कुस्त्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्रात चमकदार कामगिरी केलेला छोटा गटातील पैलवान निखिल माने याला दोन मिनिटात जावळीच्या विघ्नेश वांगडे याने आसमान दाखवले. जावळी मध्ये सुद्धा कुस्ती क्षेत्रात मौल्यवान हिरे आहेत. याची सर्वांना जाणीव करून दिली यासाठी वांगडे याला त्याचे वस्ताद राहुल मानकर यांचे तसेच कुस्ती-मल्लविद्या तालुका अध्यक्ष अरुण बापू जवळ यांचे मार्गदर्शन लाभले. विघ्नेश वांगडे हा भैरवनाथ तालीम संघ मेढा येथे सराव करत असुन त्याला जावलीतील कुस्ती शौकिनांच्या वतीने भरघोस शुभेच्छा मिळत आहेत.
जावली तालुका हा खरेतर कुस्ती क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. कुस्ती मल्लविद्या ही महाराष्ट्राची अस्सल परंपरा आहे. आणि ती जावलीतील मल्लांनी राखुन ठेवली आहे त्याचा समस्त जावलीकरांना अभिमान आहे.
पुर्वी कुस्ती म्हटलं कि घरोघरी पैलवान होते, म्हणजे प्रत्येक गावामध्ये तालिम हि होत्या, परंतु आता कुस्ती ला वैभव असताना तालुक्यातील बर्याच तालीम बंद पडल्यात आता खरच गरज आहे आपल्या तालुक्यात एक सुसज्ज तालीम असावी आणि आपल्या तालुक्यातील मल्लांनी सातासमुद्रापार आपल्या जावली तालुक्याचे नाव पोहचवावे अशी जनतेतून मागणी होत आहे.