जावली तालुक्यातील गोंदेमाळ गावामध्ये सुर्यास्त ते सुर्योदय काळात गाव ओस पाडण्याची प्रथा – आज पासून पळ.
जावली तालुक्यातील गोंदेमाळ गावामध्ये सुर्यास्त ते सुर्योदय काळात गाव ओस पाडण्याची प्रथा - आज पासून पळ.

जावली तालुक्यातील गोंदेमाळ गावामध्ये सुर्यास्त ते सुर्योदय काळात गाव ओस पाडण्याची प्रथा – आज पासून पळ.
कुसुंबी. दि.2 – सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात मेढ्याच्या दक्षिणेला सहा किमी अंतरावर ४५० लोक संख्यचे गोंदेमाळ हे गाव आहे. गुढी पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थ हे गाव सोडून शेजारच्या म्हाते ब्रु॥ या गावच्या मंदीरात येऊन पाच दिवस मुक्काम करतात.
भूतांचा वावर असल्याने सोडतात ग्रामस्थ गाव. अशी जून्या लोकांची धारणा होती. परंतू काळाच्या ओघात भूताखेतांची भिती राहिली नाही. भूताखेतांना कोण घाबरतही नाही. भूतं ही अंधश्रध्दा आहे असे ग्रामस्थ म्हणतात.
पूर्वी गोंदेमाळ या गावात प्रत्येक कुटूंबात वंश वाढत नव्हता. प्रत्येकाला एक एक अपत्यच होत होती. यावेळी देवाला नवस केल्यानंतर या गावच्या लोकांनी गावच्या वेशीबाहेर गेलेत तरच तुमचा वंश वाढत जाईल.म्हणून गोंदेमाळचे पूर्वज यांनी पाडव्याच्या नववर्षारंभा पासून गाव सोडायची प्रथा सुरु केली.
पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गावात देवीची छोटीशी यात्रा भरते. या यात्रेत सर्व ग्रामस्थ एकत्र आल्या नंतर उद्या आपणाला गाव सोडून जायचे आहे. यावर सर्वांचे एकमत होऊन तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी गाव सोडून सर्वजण म्हाते ब्रु॥ या गावच्या . नवलाई देवीच्या मंदीरात येऊन राहतात.
तीन वर्षातून एकदा गोंदेमाळ गावचे सर्व ग्रामस्थ हे स्वतःहून गाव सोडून शेजारच्या गावात मुक्कामी येतात.तेव्हा येताना सर्व जीव बरोबर घेऊन येतात. बैल, गाय, म्हैस, कोंबड्या, शेळीमेंढर, कुत्रीमांजर हे घेऊन येतात. गाव वसाड (ओसाड) झाला पाहिजे. याची खबरदारी घेतात.व येताना सर्वांचे अन्नधान्य,कपडालत्ता, गवतचारा बरोबर घेऊनच येतात. आज पर्यंत एकदाही चोरीमारी झाली नाही. गुरेढोरे ही इकडे तिकडे पळणारे प्राणी असूनही हे गाव सोडताना ओळीने येतात. म्हाते ब्रु॥ ग्रामस्थांचे प्रत्येक वेळी मोलाचे सहकार्य गोंदेमाळ ग्रामस्थांना मिळत असते.
दिवसा फक्त पुन्हा गावात कोण गेल्यास त्याने कोणीच व कसलीच कामे करायची नाहीत. घरात झाडू मारायचा नाही.आग पेटवायची नाही. स्वयंपाक करायचा नाही. मात्र सुर्यास्तापूर्वी पुन्हा गावाच्या बाहेर पडायचे. रात्रीच्या वेळी भूतं येतात व ती आपल्याला दिसतात. डोंगरात रात्रीचे पळीदे दिसतात. अशी पूर्वी पासून सर्वत्र चर्चा होत आल्याचे ग्रामस्थ सांगतात. परंतू आज पर्यंत ग्रामस्थांना कधी भूत दिसले नाही.किंवा पळीदे दिसले नाहीत. ग्रामस्थ याला अंधश्रध्दा न मानता आम्ही परंपरा चालवत आलो आहे. आमची श्रद्धा आहे.
चौकट
कित्येक वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपराआम्ही मनापासून जपत आलो आहे. गोंदेमाळ ग्रामस्थांनी अंधश्रध्देला कधीच थारा दिला नाही. परंपरा व श्रध्देने सर्व ग्रामस्थ करत हा पळ करत आलेत. ही परंपरा आपण मोडीत काढू हे आता पर्यंत कोणाच्याही तोंडून येत नाही. व याचा कोणास ही कसलाही त्रास होत नाही.
हा आम्हा सर्व ग्रामस्थांचा श्रध्देचा भाग आहे.
पुंडलिक पार्टे.
सरपंच परिषद अध्यक्ष.
अंधश्रध्दा निमुर्लन समितीचे नरेंद्र दाभोळकर हे रात्रीचे आपल्या सहकार्यासह गोंदेमाळेत गेले होते. ग्रामस्थांनी त्यांना कसल्याही विरोध केला नाही.शेवटी दाभोळकर साहेब व अंधश्रध्दा समितीचा कार्यकर्ते रात्रीचेच दोन वाजता ते परत गेले. व पुन्हा आज पर्यंत आले नाहीत.
गोंदेमाळला परत पाच दिवसा नंतर जाण्या अगोदर स्वयंभू काळ भैरवनाथाला कळा पाडून परत गोंदेमाळ गावात जाण्याची परवानगी ग्रामस्थ मागतात. जर परवानगी दिली तरच ग्रामस्थ पाच दिवसा नंतर स्वतः च्या गावी परत येतात. देवाने कळा दिला नाहीतर सात, नऊ, अकरा, तेरा अशा दिवसांनी कळा पाडून परवानगी घेऊनच गोंदेमाळला ग्रामस्थ जातात.
चौकट
बाहेरची अनेक व्यक्ती भेट देण्यासाठी येत असतात. गोंदेमाळ गावात या पाच दिवसात रात्रीची भूते दिसतात. रात्रीचे पळीदे दिसतात. ही ऐकीव माहिती आहे. पण आजपर्यंत आमच्या गावातील कोणत्याच व्यक्तीला भूते, पळीदे रात्रीचे दिसली नाहीत. गावामध्ये कोणतीच अंधश्रध्दा नाही. गावामध्ये कोणालाही भितीही वाटत नाही.
विनोद पार्टे
समाजसेवक,लक्ष्मी ट्रस्ट पुणे
गावामध्ये शिवसेनेचे जिल्हा क्षेत्ररक्षक पार्टे गुरुजी. शिवसेना तालुका प्रमुख शांताराम कदम. कामगार आयुक्त मुंबई वृषाली पार्टे. लक्ष्मी चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक,समाजसेवक विनोद पार्टे ही नामावंत ग्रामस्थ असूनही यांच्या मध्ये कसलेही मतभेद नसून ही परंपरा आम्ही श्रध्देने जोपसतो. आम्हा ग्रामस्थांमध्ये एक वाक्यता असून कोणाला कसलाही त्रास होत नाही. असे स्पष्ट मत व्यक्त करतात.