एकीव येथील श्री महाकाली झोळाई देवी मंदिर जिर्णोद्धार ,प्राणप्रतिष्ठापना भव्य उदघाटन सोहळा,व ज्ञानेश्वरी पारायण विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
www.mjnewssatara.live

एकीव येथील श्री महाकाली झोळाई देवी मंदिर जिर्णोद्धार ,प्राणप्रतिष्ठापना भव्य उदघाटन सोहळा,व ज्ञानेश्वरी पारायण विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
एकीव.दि28. नवसाला पावणारी श्री.महाकाली देवी, झोळाई देवी अशी जावली तालुक्यामध्ये ख्याती असलेल्या एकीव येथील मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जय महाकाली ग्रामस्थ मंडळ एकीव, (रजी). व ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भक्तीचा मळा फुलणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे, सातारा जिल्ह्याचे खासदार.श्रीमंत.छत्रपती. उदयनराजे भोसले, तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
1) बुधवार दि. ३० एप्रिल रोजी. 2.30 ते 6 वाजेपर्यंत मिरवणूक भैरवनाथ ढोल पथक, देहगाव सातारा, रात्री. 9:30 ते 11 पर्यंत . ह.भ.प.संतोष महाराज पुजारी यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल .
2) गुरुवार दि. 1 मे, रोजी पहाटे 5 ते सकाळी 11 पर्यंत होम हवन, कलश पूजन, प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन.
दुपारी 11 ते 01. श्री. धारेश्वर महाराजांचे प्रवचन, दुपारी, 2.30ते 4 वाजता देवीचा जागरण गोंधळ. रात्री.10 ते 12 पर्यंत सह्याद्री ईव्हेंन्ट प्रस्तुत संगित आणि गायनाचा कार्यक्रम.
3) शुक्रवार दि. 2 मे रोजी. सकाळी 7 ते 12 देवीची पालखीसह मिरवणूक.
सायंकाळी, 3 ते 6 सह्याद्री ईव्हेंन्ट प्रस्तुत महिलांसाठी होम मिनीस्टर.
रात्री. 8 ते 10 बालकिर्तनकार ( छोटे ईंदुरिकर जाहूरकर महाराज महाराज)
यांचे किर्तन.
4) शनिवार दि. 3 मे रोजी सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्वर महाराजांचे फोटो पूजन व ज्ञानेश्वरी वाचन.
दुपारी 2 ते 5, सुस्वर भजनाचा कार्यक्रम (ह.भ.प.लक्ष्मीबाई सुतार, पाटण).रात्री 6 ते 8 हरिपाठ. रात्री. 9 ते 11 किर्तनकार.ह.भ.प.श्री. सुशांत महाराज,
घोरपडे.,खोजेवाडी,(संस्थापक. गुरुमंच गुरुकुल.)
5) रविवार दि.4 मे रोजी, सकाळी, 8 ते 11 दिंडी मिरवणूक.सकाळी 11ते 12. काल्याचा अभंग प्रसाद.दुपारी, 12 ते 2 महाप्रसाद व सत्कार समारंभ. दुपारी. 2 ते 6 किर्तन सोहळा ( ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख. (ईंदुरिकर)यांचे किर्तन.
या भव्य दिव्य सोहळ्यासाठी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आपले नम्र.जय महाकाली ग्रामस्थ मंडळ एकीव (रजी.) ग्रामस्थ मंडळ,एकीव / महिला मंडळ,एकीव यांनी केले आहे.