अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी बंद केल्याने परसराम तांडा येथे भीषण पाणी टंचाई : मुके जनावरे तहानलेलेच
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी बंद केल्याने परसराम तांडा येथे भीषण पाणी टंचाई : मुके जनावरे तहानलेलेच
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड : लोहा तालुक्यातील परसराम तांडा उमरा येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाने अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी विहीर मालकाने बंद केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशी नागरिकासह मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून पाणी पुरवठा लवकर सुरळीत करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे येथील पुरुष महिला व आबालवृद्धांना भर उन्हाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पर्यंत भटकंती करावी लागत आहे.
उमरा हे लोहा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सर्कलचे गाव आहे. येथे पाच तांडे मिळून येथे गट ग्रामपंचायत असल्याने या गावासाठी शासनाचा मोठा निधी येतो मात्र आजतागायत या गावाचा विकास म्हणावा तसा झाला नाही.सन 2008 मध्ये भारत निर्माण योजना कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती लोहा तसेच ग्रामपंचायत उमरा अंतर्गत लोहा तालुक्यातील सुगाव येथील शेत गट क्रमांक 306 मधील शेत मालक माणिका उमाजी पांचाळ यांच्या शेतामध्ये शासनाने या तांड्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी विहीर खोदून दिली.तेव्हापासून आज पर्यंत ह्याच विहिरीतून तांड्याला पाणीपुरवठा होत होता परंतु गेल्या 15 दिवसापासून तेथील शेतमालकाच्या मनमानी कारभारामुळे भर उन्हाळ्यातच येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील पुरुष महिला व अबालवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. या बाबतीत नागरिकानी ग्रामपंचायतीला तांड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ग्रामपंचायतीने वरिष्ठांना माहिती दिली असून तालुका प्रशासनाने गट क्र. 306 मधील पाच शेत मालकांना पाणी बंद केल्यामुळे नोटीस बजावली आहे. व दि.16 एप्रिल 2025 रोजी स्वतः तहसीलदार इतर अधिकारी व पोलीस प्रशासन या चौकशीसाठी सुगाव येथील विहिरीच्या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.