आलेगाव शिवारात मजुरांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळले : तिघांना सुखरुप बाहेर काढले तर 8 महिला मजुरांचा मृत्यू
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

आलेगाव शिवारात मजुरांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळले : तिघांना सुखरुप बाहेर काढले तर 8 महिला मजुरांचा मृत्यू
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड :दि.4, नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी ट्रॅकरमध्ये बसून जात असलेल्या मजुरांचे ट्रॅकर रोड लगत असलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना दि.4 मार्च 2025 रोज शुक्रवारी सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान सदर घडली आहे. या घटनेतील 11 मजूरा पैकी तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले. तर 8 जण विहिरीतच अडकले असल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष असे 11 मजूर नांदेड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी दगडू शिंदे यांच्या शेतातील हळद या पीक काढणीच्या कामाला निघाले होते. हे सर्व मजुर एका ट्रॅक्टर मधून कामाला जात असतांना ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या 60 फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर मजुरासह त्यात पडले. यातील दोन महिलांना व एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र विहिरीत भरपूर पाणी असल्याने अन्य महिला, पुरुष व ट्रॅक्टर विहिरीतच अडकल्याने यात 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
या दुर्दैवी घटने विषयी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन व आमदार बालाजी कल्याणकर यांनी गंभीर दखल घेऊन सर्वोत्तरी प्रयत्न करत आहेत.
मृतांची नावे : ताराबाई जाधव (वय 35), ध्रुपता जाधव (वय 20), सरस्वती बुरड (वय 24), सिमरन कांबळे (वय 18), चउत्राबाई पारधे (वय 47), ज्योती सरोदे (वय 36) सपना राऊत (वय 24). व अन्य एक असे सांगितले जात आहे. या घटनेमुळे वसमत तालुक्यातील गुंज या गावावर शोककळा पसरली आहे.