
कुसुंबीत गुढीपाडव्याला पंचाग पूजन व वाचनाची रुढी परंपरा कायम…
मेढा,ता.३०: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्षाचे आगमन होते असते. याचेच औचित्य साधत अनेक गावांत पंचांग वाचनाची परंपरा रूढ आहे. कुसुंबी ता. जावली गावात सुद्धा पाडव्याच्या निमित्ताने पंचागाचे पूजन व वाचन करण्यात आले.
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात येते. गुढीपाडव्यालाच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे यानिमित्ताने विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू पंचांगाचे पूजन तसेच पंचागाचे वाचन करण्याची परंपरा पूर्वीपासून अनेक गावांत सुरू असून कुसुंबी ता. जावली गावात सुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंचागाचे पूजन व वाचन करण्यात आले. यावेळी कुसुंबीतील काळेश्वरी मंदिरात सरपंच मारुती चिकणे यांच्या हस्ते पंचागाचे पूजन पुजारी गणेश गुरव यांच्याकडून करण्यात आले. तसेच यावेळी पंचागाचे वाचन करण्यात आले. या दरम्यान वर्षभरातील पर्जन्य, शेती, राजकीय घडामोडी इत्यादी विषयांचा अंदाज पंचांग वाचून सांगण्यात आला. तसेच कडूलिंब व गूळ यांचा प्रसाद उपस्थितांना देण्यात आला.
यावेळी पंचाग पूजन व वाचन कार्यक्रमासाठी सरपंच मारुती चिकणे, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे रामदास वेंदे, संतोष चिकणे, विजय वेंदे, पोलीस पाटील एकनाथ सुतार, जगन्नाथ चिकणे, आनंदराव चिकणे, जितीन वेंदे, अजय कुंभार, बाजीराव चिकणे भिमराव चिकणे, जगन्नाथ चिकणे, जगन्नाथ चिकणे, जनार्दन गुरव, नामदेव वेंदे, अशोक चिकणे, रामकृष्ण वेंदे, दत्तात्रय सुतार, यशवंत चिकणे, जिजाबा वेंदे, अशोक साळुंखे, गोविंद चिकणे, ज्ञानेश्वर चिकणे,बाबू जाधव, सर्जेराव चिकणे, योगेश चिकणे, युवराज कदम,तेजस वेंदे, पत्रकार विश्वनाथ डिगे व जितीन वेंदे यांच्यासह कुसुंबी ग्रामस्थ उपस्थित होते.आभार मारुती चिकणे सरपंच यांनी मानले.