Uncategorized

कुसुंबीचा मिशन ५०० कोटी जलसाठा या पुरस्काराने जळगाव येथे गौरव.

भुजल संवर्धन समीती कुसुंबी चे कार्य मोलाचे,आणि गावच्या हिताचे.सरपंच.मारुती चिकणे.

कुसुंबीचा मिशन ५०० कोटी जलसाठा या पुरस्काराने जळगाव येथे गौरव.

भुजल संवर्धन समीती कुसुंबी चे कार्य मोलाचे,आणि गावच्या हिताचे.सरपंच.मारुती चिकणे.

क्षेत्रकुसुंबी.दि. 2. नाचणीचे गाव म्हणून नुकतेच ओळख निर्माण करणाऱ्या कुसुंबी गावाने जलसंधारणाच्या कामातून मागील वर्षी आपल्या डोंगर भागामध्ये लोकसहभागातून तसेच मिशन 500 कोटी लीटर्स जलसाठा नाम फाऊंडेशन यांच्या कडून मिळालेल्या मोफत पोकलेन मशीन द्वारे 150×100×10 क्षेत्रफळ असलेली 7 शेततळी, 30 खोल व लांब सी सी टी चर, सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता बनविला यासाठी गावातील आदर्श तरुण पिढी व प्रामुख्याने, नेहरू युवा मंडळ,काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट,दत्त सेवा मंडळ बामणवाडी,गणेश मंडळ जांभुळवाडी, जय हनुमान मंडळ,बालदारवाडी,शिवतेज ग्रुप कुसुंबी, हितचिंतक आणि महान देणगीदार पूढे सरसावले. त्यांनी व अनेक नागरीकांनी रोख रक्कम यासाठी उभी केली. यामुळे डिझेल पुरवठा करणे शक्य झाले..


रात्रंदिवस पोकलेन मशीन द्वारे डोंगरावर उपचार सुरू होते. यामुळे मागील वर्षी पडलेल्या पावसाचे करोडो लिटर वाहुन जाणारे डोंगरावरील पाणी जमिनीत मुरवण्यात कुसुंबीकर यश‌स्वी झाले..गत वर्षी त्यांचा लिंगोबाचा झरा व पंचशील नगर ला पाणी पुरवठा करणारा चेंबर जानेवारी मध्ये आटुन गेला होता ..हे दोन्ही झरे या वर्षी सतत निरंतर वाहु लागले आहेत.साठवण टाकी देखील सध्या ओव्हरफ्लो होत आहे.. यामुळे यावर्षी कुसुंबी मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात कुसुंबीकर काही अंशी यशस्वी झाले आहेत…
कुसुंबीकरांनी केलेल्या अथक परिश्रमाने त्यांचे कौतुक होत आहे..नुकताच त्यांचा जळगाव येथे *मिशन ५०० कोटी जलसाठा*” या पुरस्काराने गौरव झाला, हा पुरस्कार संपूर्ण एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे.


चौकट..
ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सा. बां.मंत्री महाराष्ट्र राज्य..
पाणी संवर्धनासारख्या महत्त्वाच्या कामात संपूर्ण गावाने एकजुटीने काम केले, हे यातून दिसून येते.
गावकऱ्यांनी पाणी संवर्धनाचे काम करून निसर्गाप्रती आपली बांधिलकी दाखवली आहे.
या कार्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.
कुसुंबी गावाचे हे कार्य इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.
आज गावकऱ्यांनी केलेले हे कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button