कुसुंबी येथे 23 मार्च रोजी नेहरु युवा मंडळ कुसुंबी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा.

कुसुंबी येथे 23 मार्च रोजी नेहरु युवा मंडळ कुसुंबी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा.
क्षेत्र कुसुंबी.दि.१५.खेळ मर्दानी छातीचा खेळ मराठी मातीचा नेहरू युवा मंडळ कुसुंबी (रजि.) त्यांच्या विद्यामाने नेहरु युवा केंद्र सातारा,व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने प्रकाश झोतातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 चे आयोजीत केल्या असुन. स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक २३-३-२०२५ रोजी कुसुंबी काळेश्वरी मंदिरा समोरील मैदानात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.
नेहरु युवा मंडळ यांच्या वतीने तीस वर्षा पासुन शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा ,शिव़ जयंती, उत्सव,गणेशोत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी प्रथमच भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,१११ रोख व चषक, द्वितीय क्रमांक ७,७७७ रोख व चषक, तृतीय क्रमांक ५,५५५ रोख व चषक, चतुर्थ क्रमांक ३,३३३ रोख व चषक .
तसेच वैयक्तिक स्वरुपात अष्टपैलू खेळाडू – चषक, उत्कृष्ट चढाई खेळाडू चषक, उत्कृष्ट पकड खेळाडू चषक. अशी बक्षिसे आहेत.
तरी या स्पर्धे करिता क्रीडा प्रेमी, खेळाडू तसेच क्रीडा रसिक यांनी उपस्थित राहून रोमांचक सामान्यांचा आनंद घ्यावा. असे आवाहन नेहरु युवा मंडळ कुसुंबी यांच्या वतीने करण्यात येत आहे.