
विध्यार्थ्यांना स्कुल बँग देऊन राजा माने यांचा केला वाढदिवस.
मेढा प्रतिनिधी :- डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे राजाध्यक्ष राजा माने यांचा वाढदिवस नुकताच गाळदेव येथे संपन्न झाला जावली तालुका डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेच्या वतीने दुर्गम अशा गाळदेव येथील पांडवकालीन गाळेश्वर मंदीरात राजा माने यांचा वाढदिवस साजरा करणेत आला वाढदिवसाबद्दल गाळदेव प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शिवाचार्य नीलकंठ स्वामी महाराज यांचे हस्ते स्कुल बॅग, तसेच फळे वाटप करणेत आली दुर्गम शाळेमध्ये असा कार्यक्रम पहिलाच झाल्यामुळे मुले खूप आनंदात होती त्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते मिडिया तसेच दैनिक पत्रकारांनी सर्व सामान्य लोकांचे प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे आमचे गावातील शाळेतील मुलांवर प्रेमाने हात फिरवला, त्यांना स्कुल साहित्य दिले यासाठी आमचे गावची, शाळेची निवड केली त्याबद्दल श्री गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ गाळदेव आपले ऋणी आहे असे मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम म्हणाले सदर कार्यक्रमांस डिजिटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, कार्याध्यक्ष देवेंद्र साळुंखे,तालुका अध्यक्ष सुनिल धनावडे,सचिव शेखर जाधव,उपाध्यक्ष राहुल ननावरे,संघटक बजरंग चौधरी,संपर्क प्रमुख जितीन वेंदे,हणमंतराव धनावडे,संजय धनावडे,राजू शेलार, आनंदराव सपकाळ, हणमंत शिंगटे,शंकर जंगम, संदीप जंगम,संपत जंगम, मनोहर जंगम ग्रामस्थ वागदरे, म्हाते बु!!,गोंदेमाळ, गाळदेव,महिला मंडळ,शिक्षक, अंगणवाडी सेविका,व विध्यार्थी उपस्थित होते स्वागत शंकर जंगम यांनी केले आभार भागोजी पाटील यांनी मानले