श्री साईबाबा हायस्कूल शाळेस वाढदिवसा निमित्ताने वॉटर फिल्टर भेट….
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

श्री साईबाबा हायस्कूल शाळेस वाढदिवसा निमित्ताने वॉटर फिल्टर भेट….
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड :दि.01, उमरा येथील किसान शिक्षण प्रसारक
मंडळाचे सहसचिव संदिप पाटील उमरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत मारतळा येथील श्री साईबाबा हायस्कूल मधील शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून स्वखर्चाने सत्तर हजार रूपयांचा वॉटर फिल्टर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेस भेट दिला आहे.
वाढदिवसानिमित्त काहींना काही भेट देणे हे एक चांगले सत्कर्म आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी पारंपारिक भेटवस्तूं देऊन आपला दिवस अर्थपूर्ण बनवता येतो. तसेच वाढदिवसानिमित्त अन्नदान, रक्तदान व धनदान, शक्य असल्यास आपल्या वजना इतके धान्यदान करून आनंद निर्माण होऊ शकतो याच शुद्ध हेतूने संदीप पाटील यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत शाळेतील मुलांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे उदात्त हेतूने ही सोय करून एक सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी माजी सभापती- बालाजी पाटील मारतळेकर, संचालक- भास्कर पाटील, सरपंच- बालाजी बिचेवाड, चेअरमन- बाळू माली पाटील, प्राचार्य- संजय पाटील, मुख्याध्यापक- एकनाथ मोरे, जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक- रवी ढगे, भाऊसाहेब पाटील, शिवाजी तुंबरफळे, अनिल मेथे, सुभाष दर्शने, वाजीदभाई आदींची उपस्थिती होती.