
कुडाळमध्ये अजित (दादा) पवार प्रीमियर लीगचे आयोजन
कुडाळ अंतर्गत सहा संघाचा समावेश
5 करहर:१४/०२/२०२५
जावली तालुक्यातील कुडाळ या गावांमध्ये प्रथमत:च अजित (दादा) पवार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे.अजित (दादा) पवार प्रीमियर लीग मध्ये कुडाळ गावांमधील एकूण सहा संघांचा समावेश असून यामध्ये प्रथम व द्वितीय नंबर काढण्यात येणार असून प्रथम विजेत्या दोन संघांना पारितोषक देण्यात येणार आहे.तसेच यामध्ये मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,क्षेत्ररक्षक,विकेट हॅट्रिक,मॅन ऑफ द मॅच अश्या वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना विविध बक्षिसे दिले जाणार असल्याचे अजितदादा प प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच अजित (दादा)प्रीमियर लीगमध्ये पिंपळेश्वर वॉरियर्स पवारआळी कुडाळचे संघ मालक संदीप पवार व अतुल पवार,देवांशश्रीस इलेव्हन संघ मालक प्रशांत कुंभार व प्रकाश माणकुंबरे,सुभेदार योद्धाज संघ मालक सोमनाथ कदम व आशिष रासकर,अजिंक्य इलेव्हन संघ मालक समीर आतार व अभि ननावरे,बकासुर ११ संघ मालक ऋषी वंजारी व अजय (लाला) कांबळे,रुद्रा इलेव्हन संघमालक गणेश कांबळे व सलमान मुंडे असे मिळून एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत.प्रथमच भरवण्यात आलेल्या अजित (दादा) पवार प्रीमियर लीगचे जावली तालुक्यातील सर्व स्तरावरून कौतुक होऊ लागली आहे.
तसेच अजित (दादा)पवार प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेट या खेळाची जोपासना अखंड सुरू राहणार असून खेळाडू आपली कला सादर करणार आहेत.तसेच अजित (दादा)पवार प्रीमियर लीगचे आयोजन दोन दिवसासाठी केले असून १५,१६ फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे. या अजित (दादा)पवार प्रीमियर लीगचे उद्घाटन संचालक सचिन सिनगारे सो व श्रीधर गोसावी जनरल मॅनेजर (जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड चिमनगाव ता.कोरेगाव) यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.अंतिम सामन्या मधून प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात येणार आहेत.तसेच या अजित दादा पवार प्रीमियर लीगसाठी विशेष चषक दिले जाणार आहे.तसेच या अजित (दादा) पवार प्रीमियर लीगचे आयोजन लक्ष्मण पवार (आप्पा) ऊस तोडणी व वाहतूकदार,संदीप पवार (आबा),पिंपळेश्वर वॉरियर्स,क्लासमेट इलेव्हन,एबीसी इलेव्हन व अभिषेक (बाळा) पवार मित्र परिवार कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेला (मयंक ॲक्वा) मयुर लोखंडे यांचे पाणी सौजन्य लाभणार आहे.