Uncategorized

क्षेत्र कुसुंबीच्या काळेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ,15 रोजी फेब्रुवारी जागर,तर यात्रा 16 फेब्रुवारी ला यात्रा.

रविवारी यात्रेचा मुख्य दिवस.

क्षेत्र कुसुंबीच्या काळेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ,15 रोजी फेब्रुवारी जागर,तर यात्रा 16 फेब्रुवारी ला यात्रा.

रविवारी यात्रेचा मुख्य दिवस.

 

क्षेत्र कुसुंबी, दि. 10. ग्रामस्थ मंडळ व काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी कुसुंबी यांच्या वतीने कुसुंबीच्या काळेश्वरी देवीच्या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व सुविधा पुरवल्या जातील. दि.12, माघ शु. पौर्णिमा या दिवशी देवीच्या यात्रेस प्रारंभझाला असून रविवार, दि. 16 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

बुधवार दि.12 देवीची ध्वज काठी उभारली जाते . शुक्रवार दि. 14 रोजी काळेश्वरी देवीचा रूद्राभिषेक हा सकाळी ७ वाजता. सुरु होतो. हा अभिषेक २ तास चालू असतो. या अभिषेकानंतर देवीला हळद कुंकवाचा मान देण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात आरतीचे ताट घेवून मंदिरात उपस्थित असतात. अभिषेक होईपर्यंत मंदिर व मंदिर परिसर महिलांनी गजबजून जातो. अभिषेक झाल्यानंतर देवीला अलंकाराचा साज चढविला जातो. त्यानंतर महाआरती होते. आरती झाली की, प्रत्येक महिला रांगेतून देवीला हळदी कुंकवाचा। मान देतात. उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना विश्वस्त मंडळाकडून भेटवस्तू दिली जाते.

शनिवार, दि. 15रोजी जागर (छबिना) असून देवीची मिरवणूक या दिवशी पालखीतून काढली जाते. मिरवणुकीसाठी सकाळपासून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर राज्यातून भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात होते. रात्री १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार होते. तत्पूर्वी मालचौंडी गावची काळुबाईची पालखी व गांजे येथील भैरवनाथाची पालखी या मिरवणुकीसाठी सामिल होतात. या पालख्या आल्यानंतर भेटीचा (मानपान) कार्यक्रम होतो. त्यानंतर देवीची पालखीतून भव्य अशी मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीमध्ये इतर पालख्या तसेच देवी देवतांच्या मुर्त्या, सासन काठ्या

सामील होतात. ढोल ताशे, लेझीम पथकासोबत गुलालाची उधळण करत काळुबाईच्या नावानं चांगभलंचा गजर करीत देवीची मिरवणूक गावातून निघते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक मिरवणूकीमध्ये सामील होतात.

बघवार यात्रेचा मुख्य दिवस रविवार, दि. 16 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी लाखो भाविक देवीचे दर्शन घेतात. विश्वस्त व ग्रामस्थ मंडळ यांच्या मार्फत भाविकांसाठी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या विशेष नियोजन केले जाते तसेच जंगी कुस्तीच्या फडाचे नियोजन दुपारी ३ते ६ स वेळेत केले जाते. भव्य कुस्यांचा फडामध्ये काळेश्वरी केसरी हा किताब दिला जातो. दि. 15 फेब्रुवारी रोजी. सायंकाळी ७ ते१० या वेळेत व दिनांक. 16 फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत ग्रामस्थ मंडळ व शिवतेज ग्रुप कुसुंबी. यांच्या मार्फत महाप्रसादाचे नियोजन केले जाते, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष. रामदास वेंदे, सरपंच.मारुती चिकणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button