क्षेत्र कुसुंबीच्या काळेश्वरी देवीची यात्रा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न.
www.mjnewssatara.live

क्षेत्र कुसुंबीच्या काळेश्वरी देवीची यात्रा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न.
क्षेत्र,कुसुंबी, दि. 18. ग्रामस्थ मंडळ व काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी कुसुंबी यांच्या वतीने कुसुंबीच्या काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त दै.ऐक्य ने प्रकाशित केलेल्या कुसुंबी काळेश्वरी यात्रा विशेष पुरवणीचे प्रकाशन काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच सरपंच,यात्रा कमिटी गावतील महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले.
माप शु. पौर्णिमा या दिवशी देवीच्या यात्रेस प्रारंभ झाला. रविवार, दि.16 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता.
दै. ऐक्य ने प्रकाशित केलेल्या कुसुंबी श्री काळेश्वरीची यात्रा विशेष पुरवणीचे प्रकाशन काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सरपंच, यात्रा कमिटी गावतील महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले. दै.ऐक्य चे कार्यकारी संपादक जितेंद्र जगताप यांचा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्ट, शिवतेज ग्रुपचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. दै.ऐक्य चे प्रतिनिधी प्रतिनिधी जितीन वेदे यांनी आभार मानले.
मंगळवार, दि.15 रोजी जागर (छबिना) देवीची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली. मिरवणुकीसाठी सकाळपासून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर राज्यातून भाविकांनी गर्दी केली होती. रात्री 11वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी मालचौंडी गावची काळुबाईची पालखी व गांजे गावच्या भैरवनाथाची पालखी या मिरवणुकीसाठी सामिल झाल्या होत्या या पालख्या आल्यानंतर भेटीचा (मानपान) कार्यक्रम ज्ञाला. त्यानंतर देवीची पालखीतून भव्य अशी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये इतर पालख्या तसेच देवी देवतांच्या मुर्त्या, सासन काठ्या सामील झाल्या होत्या, ढोल ताशे हलगी, लेझीम पथकासोबत गुलालाची उधळण करत काळुबाईच्या नावानं चांगभलंचा गजर करीत देवीची मिरवणूक
गावातून निघाली. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक मिरवणूकीमध्ये सामील झाले होते. यात्रा कालावधीत ग्रामपंचायतीने भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवली होती. शिवतेज ग्रुपच्या वतीने सकाळपासूनच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अंत्यत सुंदर अशी व्यवस्था या ग्रुपने विशेषतः महिलांनी केली होती. महिला स्वतः महाप्रसाद वाटपाचे काम करत होत्या, यात्रा कालावधीत मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट..या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त उपस्थित असलेले मान्यवर व सरपंच. मारुती चिकणे, ट्रस्ट अध्यक्ष. रामदास वेंदे, उप अध्यक्ष. विजय वेंदे,सदस्य. संतोष चिकणे,कार्यकारी संपादक. जितेंद्र जगताप,नेते. सचिन करंजेकर,बापु देशमुख. व महिला.संगिता वेंदे,सोनाबाई शेलार,सिमा वेंदे,वैशाली वेंदे, कविता वेंदे,निता वेंदे, अर्चना वेंदे,सिमा महाडीक,