खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
www.mjnewssatara.live

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सातारा.दि.22 : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे .यानिमित्ताने उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने शनिवार रविवार दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 23 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार मौजे नुने येथे महाआरोग्य शिबिर, चिंचनेर वंदन मारुती मंदिर येथे नेत्र तपासणी शिबिर , मतकर कॉलनी शाहूपुरी येथे आरोग्य शिबिर,तसेच पोलीस हेडक्वार्टर येथील गोशाळेमध्ये देशी गाईंना चारा गूळ आणि खुराक वाटप इत्यादी कार्यक्रम होणार आहेत .
दुपारी एक ते सहा दरम्यान गांधी मैदान सातारा येथे रिक्षा सौंदर्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघाच्या वतीने हा कार्यक्रम घेतला गेला आहे .सायंकाळी सात वाजता न्यू इंग्लिश कोंडवे येथील मैदानावर भव्य राज्यस्तरीय खुल्या डान्स स्पर्धा होत आहेत .दिनांक 24 फेब्रुवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले हे राजमाता कल्पनाराजे यांचे शुभाशीर्वाद आणि येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणार आहेत .सकाळी सात वाजता शिखर शिंगणापूर शंभू महादेव येथे महाभिषेक करणार आहेत .सकाळी नऊ ते एक एहसास मतिमंद मुलांची शाळा वळसे येथे नेत्र तपासणी कार्यक्रम, सकाळी नऊ ते पाच अपशिंगे मिलिटरी येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे .सकाळी दहा ते दोन जिल्हा परिषद शाळा चिंचणी वंदन येथे खाऊ वाटप, सकाळी दहा वाजता आंबेवाडी जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य वाटप ,सकाळी दहा ते दोन जिल्हा परिषद पाडळी येथे खाऊ वाटप , सकाळी अकरा वाजता बुधवार नाका येथे राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे उद्घाटन, दुपारी बारा वाजता अन्नदान सायंकाळी पाच वाजता वळसे येथील मुलांच्या शाळेत मतिमंद मुलांना जेवण दिले जाणार आहे व सायंकाळी सहा वाजता नेताजी सुभाष चंद्र बोस चौक सुशोभीकरण कार्यक्रम होणार आहे
तसेच सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत उदयनराजे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलमंदिर येथील निवास येथे उपस्थित राहणार आहेत .यावेळी या कार्यक्रमासह उदयनराजे यांच्या वाढदिवसाला सातारकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सातारा लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर यांनी केले आहे . उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हार बुके ऐवजी उपयुक्त शालेय शैक्षणिक साहित्य शुभेच्छुकांनी कार्यालयात जमा करावे हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे .