जिल्हाधिकारी – अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे बदली तर नांदेडचे नवे जिल्हाधिकारी – राहुल कर्डिले यांची नियुक्ती
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

जिल्हाधिकारी – अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे बदली तर नांदेडचे नवे जिल्हाधिकारी – राहुल कर्डिले यांची नियुक्ती
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड : दि.4, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी- मा. अभिजीत राऊत यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या जागी नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून मा.राहुल कर्डिले (भापसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश दि.4 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नियुक्ती छत्रपती संभाजी नगर येथे सह आयुक्त कर वस्तू व सेवाकर या पदावर मा. मिलिंदकुमार साळवे यांच्या जागी केली आहे. तसे आदेश नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहेत.
मा. अभिजीत राऊत हे अडिच वर्षांपूर्वी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
मितभाषी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली होती. त्यांनी अवघ्या काही दिवसांतच जिल्हा प्रशासनाच्या कामकाजास त्यांनी चांगले वळण लावले आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याच बरोबर त्यांनी जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला.