Uncategorized

जावळीतील वनवा थोपवण्यासाठी जेष्ठ नागरिकांन सोबत पत्रकाराची ही धाव.(अजित जगताप)

सांगवी डोंगरावरील वणवा विझविण्यासाठी भणंग गावच्या ज्येष्ठांचा खारीचा वाटा,बेभान मद्यधुंद युवकांचा प्रताप.

जावळीतील वनवा थोपवण्यासाठी जेष्ठ नागरिकांन सोबत पत्रकाराची ही धाव.(अजित जगताप)

सांगवी डोंगरावरील वणवा विझविण्यासाठी भणंग गावच्या ज्येष्ठांचा खारीचा वाटा,बेभान मद्यधुंद युवकांचा प्रताप.

क्षेत्र कुसुंबी. दि.24. सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली असून वनसंपत्ती जतन करण्याची भूमिका गाव पातळीवर घेत आहेत. परंतु काही अति उत्साही व्यसनी लोकांच्यामुळे जावळीत वनवा लावला जात आहे. असाच एक वनवा थोपवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसोबत पत्रकार मोहन जगताप यांनी धाव घेतल्यामुळे वनवा लावणारा च मनसूब
पायदळी तुडवले गेले आहे.


माहिती अशी की जावळी तालुक्यातील वन धनसंपत्ती जतन करण्याची भूमिका स्थानिक ग्रामस्थ घेत आहेत. वनविभागातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे सर्वच भागात ग्रस्त घालणे अशक्य झाले आहे. वन समिती अस्तित्वात असली तरी त्याला नैतिक जबाबदारी पार पाडत असताना अनेकदा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. अलीकडे सायंकाळच्या वेळेला वनवा पेटवून काही समाजकंटक अनेक छोट्या मोठ्या पशु प्राण्यांचे जीव घेत असतात. यावर कायद्याने बंदी असली तरी कायद्याचे अंमलबजावणी करणे हे शासनाचे फक्त काम नसून समाजाचेही काम आहे. याची जाणीव ठेवून
सांगवी डोंगरावरील वणवा विझविण्यासाठी खऱ्या अर्थाने रविवारी सायंकाळी भणंग गावचे अनंत जाधव व प्रकाश जाधव यांच्यासह पत्रकार मोहन जगताप यांनी सामाजिक जाणीव कायम ठेवली.
जावली तालुक्यातील मेढा दक्षिण विभागातील वेळे कामथी ते भोगवली या दरम्यानच्या डोंगरावर ग्रामीण जीवनशैली जतन करणाऱ्या वाड्यावरती आहेत. या मार्गावर असून सातारा कास मार्गे महाबळेश्वरला जाणार्‍या राजमार्ग आहे .या परिसरात काही अति उत्साही व अभ्यासू भेट देत असतात. जगाचा आनंद घेतात परंतु काही व्यसनी टोळकं या ठिकाणी येऊन या निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यापेक्षा आपल्या व्यसनाच्या पायी या निसर्गावर व जाळून नष्ट करण्याचे पाप करतात. यांच्या पापाचे रांजण कधीतरी भरेल त्यावेळी त्यांना समजलेच परंतु अशा वेळेला ज्येष्ठ नागरिक अनंत व प्रकाश जाधव व पत्रकार मोहन जगताप एनडी फक्त बातमीदारी न करता निसर्ग वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्न कौतुकस्पद बाब ठरलेली आहे. वनवा विझवणसाठी कोणती साधनसामुग्री नसतानाही ओल्या धुडपाने वनवा विझवण्याचा प्रयत्न केला. जावली विभागाचे वन अधिकारी श्री निवृत्ती चव्हाण यांचे बरोबर संपर्क साधून तातडीने त्यांची कास पठार वनरक्षक समाधान वाघमोडे व कास पठार समितीचे पदाधिकारी व वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी ब्लॉअरच्या सहाय्याने वनवा विझवला .
डोंगरदऱ्यात आग लावणे बंधनकारक असून या मार्गावरून जाणारे काही बेधुंद युवक असे प्रकार करत असतील तर त्यांना तात्काळ बंदोबस्तही करण्यात यावा. व रात्र गस्तीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी अनंत जाधव व प्रकाश जाधव यांनी केली आहे . वनविभागाने या तिन्ही वनमित्रांचा सन्मान करून समाजामध्ये चांगला संदेश द्यावा अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button