बारड खुण प्रकरणी आरोपीस नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने केला जामिन मंजूर : अँन्ड. कपिल पाटील गाडेगावकर यांनी मांडली आरोपीची बाजू.
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

बारड खुण प्रकरणी आरोपीस नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने केला जामिन मंजूर : अँन्ड. कपिल पाटील गाडेगावकर यांनी मांडली आरोपीची बाजू.
एम.जे.न्यूज सातारा, (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड:- दि.6, बारड पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्र.104 /2024 मध्ये अटक करण्यात आलेल्या दत्ताराम महाजन पवार (वय 48, व्यवसाय: शेती, रा. पारडी वैजापूर) यांना सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. अर्जदाराच्या वतीने अधिवक्ता कपिल पाटील गाडेगावकर यांनी जामिन अर्ज सादर केला होता.
अर्जदारावर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 103 (1),115 (2), 351(2), 3 (5) अंतर्गत खुणाचा गुन्हा दाखल होता. अर्जदार व मयत बालाजी यांच्या तील वाद व त्यानंतर झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अर्जदाराला अटक करण्यात आली होती. अर्जदार आरोपी यांचे वकील कपिल पाटील गाडेगावकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने खटला पूर्ण होईपर्यंत अर्जदारास कठोर अटींवर जामिन अर्ज क्र. 959/2024 दत्ताराम विरुद्ध. राज्य सरकार मध्ये दि. 04 फेब्रुवारी 2025 रोजी मंजूर केला आहे.
बारड पोलीस स्टेशन, ता. मुदखेड, जिल्हा नांदेड येथे गुन्हा क्र. 104/2024 मध्ये भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 103(1),115 (2), 351(2), 3 (5) अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या खुणाच्या गुन्ह्यांसाठी अटक केल्यावर, अर्जदार दत्ताराम महाजन पवार, वय 48 वर्षे, व्यवसाय: शेती, रा. पारडी वैजापूर, ता. मुदखेड, जिल्हा नांदेड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 483 अंतर्गत नियमित जामिनासाठी अर्ज केला.
अर्जदार आरोपी व मयत बालाजी (तक्रारदाराचे वडील) हे संख्खे भाऊ. दि.01 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपी दत्ताराम यांनी तक्रारदाराच्या शेतातील गोठ्याच्या समोरील ठिकाणाहून दगड नेले. म्हणून मयत बालाजी यांनी त्या कृतीला विरोध केला आणि त्यावेळी आरोपी दत्ताराम याने मयत बालाजीला त्रास देण्याची धमकी दिली.
दि. 02 नोव्हेंबर 2024 रोजी सुमारे 11: 30 वाजता अर्जदार आरोपी व मयत बालाजी यांच्यात दगड नेण्याच्या कृतीवरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर आरोपी व त्यांचे पुत्र पवन आणि प्रविण यांनी तक्रार दाराच्या घरी जाऊन त्यांना दगड नेण्यास परवानगी न दिल्याबद्दल प्रश्न विचारले. मयत बालाजी त्यांना समजावत असताना, सह-आरोपी पवन यांनी तीक्ष्ण हत्यार कत्ती ने मयत बालाजीच्या डोक्यावर वार केला ज्यामुळे रक्तस्त्राव झाला. अर्जदार आरोपी आणि प्रविण यांनी तक्रारदारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर काका विठ्ठल आणि शाहाजी व इतर चुलतभावंडांनी अर्जदार व इतर अभियुक्तांकडून मयताला वाचवून बारड येथील रुग्णालयात नेले. उपचारानंतर मयत घरी परतल्यावर अचानक बेशुद्ध होऊन जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तक्रारदाराने बारड पोलीस स्टेशनला जाऊन घटना नोंदवली.
अर्जदाराच्या वतीने अँन्ड. कपिल पाटील गाडेगावकर यांनी जामिन मंजूर करण्याची विनंती केली, त्याचे मुख्य म्हणणे होते की अर्जदारावर खोटा आरोप लावला गेला आहे, कारण त्याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही, अर्जदार निरपराध आहे व त्याने कोणताही गुन्हा केला नाही, अर्जदार एकटा कमावणारा आहे, त्याच्याविरुद्ध तपास पूर्ण झाला आहे व त्याला जामिन देण्यात काहीही हानी नाही.
तपास अधिकारी यांनी अर्जाला विरोध केला व अर्जदाराचे नाव स्पष्ट आहे, त्याचा गुन्ह्यातील सहभाग ठळक आहे, गुन्ह्याचा तपास अजूनही चालू आहे, अर्जदार साक्षीदारांशी छेडछाड करेल, तपासात अडथळा आणेल, अर्जदार जामिनावर सुटल्यास पुन्हा गुन्हा करेल, त्यामुळे जामिन अर्ज फेटाळावा असा युक्तिवाद केला.
अर्जदार आरोपीचे वकिल ऍड. कपिल पाटील गाडेगावकर यांनी यूक्तीवादात असे म्हटले आहे की FIR वाचल्यानंतर अर्जदाराने कोणताही गुन्हा केला हे मानण्यास कोणतेही आधार नाहीत, अर्जदाराचा पोलिस कोठडीत तपास होण्याची आवश्यकता नाही, गुन्ह्याची तीव्रता जामिन नाकारण्यासाठी एकटा आधार नसावा, अर्जदार कोणत्याही जामिनाच्या अटींसाठी तयार आहे, अर्जदार नांदेड जिल्ह्याचा कायमचा रहिवासी आहे, अर्जदार आदरास पात्र माणूस आहे व त्याच्यावर कोणताही गुन्हा झाला नाही, म्हणून त्याला जामिनावर सोडण्यात यावे. तसेच घटनेनंतर मयत स्वतःहून रुग्णालयात जाऊन उपचार घेतले व घरी परतताना अचानक बेशुद्ध होऊन मृत्यू झाला हे लक्षात घेतले पाहिजे, हे दर्शवित आहे की मयताचा मृत्यू हत्याराने झालेल्या जखमेमुळेच झाला असे आज रोजी निश्कर्ष काढणं योग्य नाही.
दुसरीकडे, सरकारी वकिलांनी अर्जाचा विरोध केला आहे व अर्जदाराविरुद्धचे आरोप गंभीर आहेत व गुन्हे सिद्ध करतात, अर्जदाराने मयताविरुद्ध द्वेष बाळगला होता, अर्जदाराचा निर्दोषपणा आणि अज्ञानता फेटाळून, अर्जदार साक्षीदारांशी छेडछाड करेल, तपासात अडथळा आणेल, त्याला जामिन मिळू नये.
जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून, FIR मधील घटनेनुसार अर्जदार व त्याचे पुत्र व मयत यांच्यात दि.02 नोव्हेंबर 2024 रोजी वाद झाला व सह- आरोपी पवनने मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार डोक्यावर एकच जखम आहे. FIR मध्ये अर्जदाराच्या भूमिकेनुसार, त्याने मयताला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, कोणतेही तीक्ष्ण हत्यार वापरले नाही असे विश्लेषण केले.
अर्जदार नांदेड जिल्ह्याचा कायमचा रहिवासी आहे, त्यामुळे त्याच्या पळून जाण्याचा धोका नाही. तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे त्याची उपस्थिती आवश्यक नाही. गुन्ह्याची तीव्रता एकटा आधार जामिन नाकार ण्यासाठी नसावा. खटल्याचा निकाल लागण्यास वेळ लागेल व अर्जदाराच्या विना उपयोग तुरुंगात ठेवण्यात काहीही उपयोग नाही व कठोर अटी घालून तपास कर्त्यांच्या शंका दूर होऊ शकतात. असा निष्कर्ष काढला.
निकाल देताना न्यायालयाने संदर्भ दिला की, संजय चंद्रा विरुद्ध C.B.I. [2012(1) SCC 40] मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जामिनाचा उद्देश दंडात्मक नाही, जामिन नाकार ण्यासाठी गुन्ह्याची तीव्रता एकटा आधार नसावा, खटल्याचा निकाल लागण्यास वेळ लागेल व आरोपीला सन्मानजनक खटल्याची संधी मिळायला हवी. न्यायालय असेही म्हणले की, सर्व तथ्ये आणि परिस्थिती विचारात घेता व अधिक काही न बोलता, अर्जदारास जामिनावर सोडण्याचे आदेश देणे उचित ठरते असे सांगून जामीन अर्ज मंजूर व निकाली काढला. अर्जदार आरोपी यांचे वकील कपिल पाटील गाडेगावकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने खटला पूर्ण होईपर्यंत अर्जदारास कठोर अटींवर जामिन मंजूर केला आहे.