उमरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
एम.जे.न्यूज, सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट

उमरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
एम.जे.न्यूज, सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट
नांदेड :- दि.3, स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील स्त्रियांच्या उद्धाराचा मार्ग खुला करणाऱ्या थोर समाज सुधारक देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला बचत गटाच्या वतीने येथील ग्रामपंचायत कार्यालयात व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजी आंबेडकर नगर येथे साजरी करण्यात आली.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिला बचत गटाच्या वतीने पुष्पहार
अर्पण करून करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील सिरसाट, मुख्याध्यापक व्यंकटराव लामदाडे, शंकरराव पांचाळ महिला बचत गटाच्या रेणुका जाधव, विमल सिरसाट, वंदनाबाई वाघमारे, शालुबाई पट्टेकर, शोभा सिरसाट ग्रामपंचायत लिपिक मुबीन शेख आदीसह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.