स्व.यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा सन2024/25 मध्ये तालुकास्तरीय बाल लघुनाटिका स्पर्धेत निपाणी शाळेचा तृतीय क्रमांक पटकवला.
एम.जे.न्युज. सातारा.

स्व.यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा सन2024/25 मध्ये तालुकास्तरीय बाल लघुनाटिका स्पर्धेत निपाणी शाळेचा तृतीय क्रमांक पटकवला.
एम.जे.न्युज. सातारा.
जावली.दि.6.स्व यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा 2024/25 मध्ये जावली तालुकास्तरीय बाल लघुनाटिका स्पर्धा मोठा गटामध्ये जि प प्राथमिक केंद्रशाळा निपाणी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला .
यशस्वी विदयार्थी व शिक्षक यांचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री कर्णे साहेब व अरविंद दळवी साहेब, केंद्रप्रमुख श्री सुरेश धनावडे साहेब, श्री बळवंत पाडळे साहेब ,मिलन मुळे साहेब तसेच ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले . यावेळी मुख्याध्यापक श्री सखाराम मालुसरे यांचे मार्गदर्शनाखाली व सहशिक्षिका लतिका कारंजकर मॅडम , वसावे सर, कोटंगले सर व सुजित मालुसरे व सर्व विद्यार्थी वर्ग निपाणी शाळा व फुरुस शाळा यांचे उत्कृष्ट सक्रीय सहभागातून निपाणी शाळेची सक्रीय भुमिका जाणवते .
सन २०२४ / २५ या शैक्षणिक वर्षात या निपाणी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले .
लांब उडीमध्ये शुभ्रा तोरणे हिची जिल्हा स्वरावर निवड झाली . खोखो, कबडडी, रस्सीखेच , धावणे यामध्ये तालुका स्तरावर उत्तम कामगिरी बजावली .
तर या वर्षात शनिवार रविवार या सुट्टयांचे दिवशी शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल किल्ले रायगड येथे काढण्यात आली . शाळेमध्ये लोक सहभागातून विद्यार्थ्यांसाठी वर्षातून तीन वेळा दप्तर, लेखन साहित्य व स्वेटर यांचे वाटप करण्यात आले . शालेय परसबाग निर्मिती, क्षेत्रभेटी, वनभोजन, पाककृती स्पर्धा, तसेच सहशालेय उपक्रमाबरोबर शालेप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे .
यासाठी ग्रामस्थ , पालक यांचे उत्तम सहकार्य लाभते .