सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून 812 कोटी मंजूर : जिल्हाधिकारी राऊत.
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून 812 कोटी मंजूर : जिल्हाधिकारी राऊत.
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.
नांदेड : दि.7, नांदेड जिल्ह्यातील माहे सप्टेबर 2024 मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतक-यांना मदतीसाठी शासनाने 812 कोटी मंजुर केले आहे.
नांदेड जिल्ह्यात सप्टेबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पिक नुकसान झालेल्या 7,83,915 शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लक्ष इतकी रक्कम मंजूर केली आहे. ही रक्कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आता पर्यंत जिल्हयातील 3, 83,297 इतक्या शेतकऱ्यांना 417 कोटी 52 लक्ष इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे.
माहिती भरण्यात आलेल्या शेतकर्याचे संदर्भ क्रमांक (व्ही.के.नंबर) त्या त्या गावाच्या तलाठयांना देण्यात आले आहेत.(व्ही.के.नंबर) या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा/ आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणा-या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत 4 लक्ष शेतकरी यांची माहिती पुढील 2 दिवसात भरण्यात येणार आहे.
त्यामुळे सप्टेबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे पिक नुकसान झालेल्या शेतकरी यांनी आपल्या तलाठीकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्यावा व ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, जेणे करुन त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांनी केले आहे.