स्किल बेस एज्युकेशन आजच्या काळाची गरज : प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

स्किल बेस एज्युकेशन आजच्या काळाची गरज : प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड : दि.21, सद्यस्थितीलां उच्च शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत, होणाऱ्या बदलाला सामोरे जाण्यासाठी यशवंत महाविद्यालय देखील आधुनिक शैक्षणिक साधन सामग्रीने सुसज्ज होत आहे. महाविद्यालया मध्ये स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट लॅबोरेटरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या एज्युकेशनल टूलचा वापर केला जात आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त नवीन संकल्पना आणि माहिती पोहोचण्याचे काम केले जात आहे त्यामुळे स्किल बेस एज्युकेशन आजच्या काळाची गरज आहे असे मत प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
दि.20 जानेवारी 2025 रोजी यशवंत महाविद्यालयात पालक, विद्यार्थी व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य शिंदे बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, बदलत्या काळाबरोबर संशोधन आणि रोजगाराच्या नवनवीन संधी देखील निर्माण होत आहेत परंतु या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे स्किल बेस एज्युकेशन असणे आवश्यक आहे.जर हे स्किल बेस एज्युकेशन नसेल तर निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही म्हणून खऱ्या अर्थाने स्किलबस एज्युकेशन ही आजच्या काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले
या मेळाव्याचे प्रास्तविक पालक, विद्यार्थी, शिक्षक मेळावा समितीचे संयोजक प्रा.डॉ.शिवराज सिरसाट यांनी केले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सौ.ज्योती डोंगळीकर यांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले, सौ.भावना सोलंकी मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महाविद्यालय शिक्षक आणि प्राचार्य यांची भूमिका विशद केलें, सुधाकर राठोड यांनी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट मुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होते असे मत व्यक्त केले, तर प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांबरोबरच पालकांची देखील भूमिका महत्त्वाची आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.डी.भोसले यांनी केले. या प्रसंगी पालक,विद्यार्थी, शिक्षक मेळावा समितीचे सदस्य प्रा.धनराज भुरे, प्रा.रमेश चीलावर, चिकटे, प्रा.मिरा फड मॅडम, प्रा. नखाते, प्रा.प्रवीण मिरकुटे, प्रा.निलेश चव्हाण, प्रा.एन.बी.गव्हाणे, प्रा.एस.एस.वाकोडे, प्रा.प्रवीण मिरकुटे, प्रा.निलेश चव्हाण, प्रा.नखाते, प्रा.साहेबराव शिंदे, याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि पालक प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक- संदीप पाटील, गजानन पाटील, बिरादार पाटील, यांनी परिश्रम घेतले.