शिक्षक सेना अल्पसंख्यांक सेलच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी : मुस्तफा शेख यांची निवड
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

शिक्षक सेना अल्पसंख्यांक सेलच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी : मुस्तफा शेख यांची निवड
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड :- दि.20, शिक्षक सेनेचा मराठवाडा विभागीय मेळावा दि.19 जानेवारी रोजी नांदेड येथील विश्राम गृह येथे घेण्यात आला, यावेळी काही शिक्षक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या, त्यात नांदेड जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी- मुस्तफा शेख यांची निवड शिक्षक सेनेचे राज्यध्यक्ष तथा शिक्षक आमदार- ज.मो. अभ्यंकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष- विठूभाऊ चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष- सुधाकर कापरे, उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष- मुस्ताक पटेल, मराठवाडा कार्याध्यक्ष- बालासाहेब राखे, मराठवाडा सचिव- भाऊसाहेब वावूळ, खाजगीचे नांदेड जिल्हाध्यक्ष- तानाजी पवार, प्रा.परसूराम यसलवाड, गंगाधर कदम, सचिव- रवींद्र बंडेवार यासह शिक्षक सेनेचे नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधाकारी, सदस्य उपस्थित होते.
नांदेड जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मुस्तफा शेख यांची निवड झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.