
शब्दगंध पाथर्डी शाखेची बैठक
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)
दि.9.*शब्दगंध साहित्यिक परिषद, पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 5 वा. सेमिनार हॉल, बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.* अशी माहिती पाथर्डी तालुका कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे यांनी दिली.
*सदर बैठकी करिता शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, राज्य कार्यकारणी सदस्य रवींद्र दानापुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.*
सदर बैठकीमध्ये नवीन सभासद करून घेणे, दोन वर्षा करिता नवीन कार्यकारी मंडळ तयार करणे, सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन सहभाग वाढवणे, निधी संकलनासाठी प्रयत्न करणे इ. विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी पाथर्डी तालुक्यातील सर्व साहित्यिक व सभासद बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र उदारे,बंडू गाडेकर, चंद्रकांत उदागे, प्रशांत रोडी,बाळासाहेब कोठुळे, सुनीता पालवे, दिलावर फकीर, भाऊसाहेब गोरे, शशिकांत गायकवाड, संतराम साबळे, डॉ. अशोक डोळसे, हुमायून आतार, डॉ.राजकुमार घुले यांनी केले आहे