शासनाच्या योजनांचा लाभ ग्रामीण सह सर्वच पत्रकारांना मिळावा.
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..

शासनाच्या योजनांचा लाभ ग्रामीण सह सर्वच पत्रकारांना मिळावा.
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..
जितीन वेंदे.
मेढा.दि.8. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण सह सर्वच पत्रकारांनाही मिळावा . अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार -(सातारा जावळी विधानसभा ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने , आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन, व पत्रकार दिनाचे निमित्ताने जावळीचे तहसीलदार हणमंतराव कोळेकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असताना ग्रामीण पत्रकारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. अधिस्विकृती धारक पत्रकारांना गंभीर आजार ,अपघात झाल्यास किंवा अकस्मित निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत. त्याचप्रमाणे पत्रकारांचेप्रमाणे पती-पत्नी व अवलंबून असलेले मुले यांना आजारपणांमध्ये आर्थिक मदत. एसटी महामंडळाच्या साधी ,निमआराम बसेस मधून मोफत प्रवास .ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा सन्माननिधी दिला जात असून या सर्व योजनांचा लाभ सर्वच (ग्रामीण) पत्रकारांनाही मिळावा . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार -(सातारा जावली विधानसभा ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
खरंतर ग्रामीण पत्रकार हे पदरमोड करून तळागाळा पर्यंत जाऊन जनतेच्या समस्या ,अडीअडचणी शासन दरबारी पोहोचवण्याचे काम करतात. तर शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात .शासकीय यंत्रणा व सर्वसामान्य जनता यांच्या मधील ग्रामीण पत्रकार दुवा आहे .मात्र ग्रामीण पत्रकार शासनाच्या विविध लाभाच्या योजना पासून लांब आहे. शासनाच्या सर्व योजनाचा लाभ ग्रामीण पत्रकारांना मिळावा . त्याच त्याचबरोबर पत्रकारांसाठी टोल माफीची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याची बजावणी झाली नाही . शासन पातळीवरून त्याची अंमलबजावणी व्हावी. व त्याचाही लाभ सर्वच (ग्रामीण )पत्रकारांना मिळावा . अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा – जावळी विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे, तालुका प्रसिद्धी प्रमुख नारायणराव शिंगटे , युवा कार्यकर्ते मोहन देशमुख उपस्थित होते.
आपल्या भावनां शासन दरबारी वरीष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील असे आश्वासन तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांनी दिले.
फोटो
तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांना निवेदन देताना सुरेश पार्टे , नारायणराव शिंगटे , मोहन देशमुख