राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा ढवळेवाडी येथे प्रारंभ.
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा ढवळेवाडी येथे प्रारंभ.
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे.
पाथर्डी.दि.2. तालुक्यामध्ये ढवळेवाडी या ठिकाणी दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराचा आज प्रारंभ झाला. संस्थेची विश्वस्त माननीय श्री राहुल दादा राजळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वर्गीय दादा पाटील राजळे व स्वर्गीय माजी आमदार राजीव राजळे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प मच्छिंद्र महाराज चितळे व ह भ प अर्जुन महाराज चितळे सरपंच बाबासाहेब चितळे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पानखडे सर दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राज धर टेमकर चेअरमन सुभाष माने कविवर्य बाळासाहेब कोठुळे झुंबरराव ढवळे सूर्यभान ढवळे प्राध्यापक सचिन पवार यासह आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी राहुल दादा राजळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते म्हणाले ग्रामीण जीवनशैलीचे विद्यार्थ्याला दर्शन व्हावे व खेड्यातल्या समस्या समजून घेता याव्यात.
तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व त्यामधून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावे हाच या शिबिराचा उद्देश असतो विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये रोज आनंदी जीवन जगावे व गावातील विकास कामे श्रमदानातून करावे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा मनमुराद आनंद घ्यावा असे मत त्यांनी यावेळी मांडली प्राचार्य डॉक्टर टेमकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी ते म्हणाले स्वर्गीय दादा पाटील राजळे यांचे ढवळेवाडी वरती विशेष प्रेम होते हरितक्रांतीची स्वप्न त्यांनी ढवळेवाडी मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
कॉलेजच्या व वृद्धेश्वर कारखान्याच्या उभारणीपासून ढवळेवाडीची मोठे योगदान आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा व महिलांचा सन्मान करावा व त्यांच्याशी आदराने वागावे व प्रत्येकाशी सुसंवाद साधावा शिबिराच्या कार्यकालमध्ये विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व यामधून घडत असते अनेक गोष्टी याठिकाणी शिकायला मिळतात व त्यातूनच भविष्यातील भारताचे आदर्श नागरिक जन्माला येणार आहे त तेव्हा प्रत्येकाने शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा तसेच यावेळी सरपंच बाबासाहेब चितळे यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच ह भ प अर्जुन महाराज चितळे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प मच्छिंद्र महाराज चितळे यांनीही अध्यात्मातील काही दाखले देऊन विद्यार्थ्यांना यावेळी बहुमूल्य मार्गदर्शन केले या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले कुमारी साठे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते तसेच ढवळेवाडी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होत्या.