राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सद्दैव तत्पर शिक्षक सेनेच्या विभागीय बैठकीत : आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे परखड मत
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट

राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सद्दैव तत्पर शिक्षक सेनेच्या विभागीय बैठकीत : आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे परखड मत
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट
नांदेड :दि.20, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मराठवाडा विभागीय बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती तीअनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली.
दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे शिक्षक सेनेचे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीला सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर हे होते, तर प्रामुख्याने लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा आजी आ. रोहिदास चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार, राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण, उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल, राज्य कोषाध्यक्ष सुधाकर कापरे, मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, मराठवाडा सचिव भाऊसाहेब वाहूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना लातूरचे संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण म्हणाले की, समाजात शिक्षकांचे स्थान हे मोठे आहे, आपण घडलो ते शिक्षकामुळे त्यासाठी शिक्षकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे अभिवचन दिले. माजी जिल्हाप्रमुख प्रकाशजी मारावार यांनी “शिक्षक हा समाजाचा कणा आहे” तसेच अशा पडझडीच्चा कठीण काळात सुद्धा शिक्षक, उध्दवजी ठाकरे यांच्या पाठीशी एकसंघ उभे आहेत असे गौरवोद्गार काढले. यावेळी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षक सेनेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी शिवकन्या पटवे व अश्विन वाघमारे या दोन पदाधिकाऱ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण व नवोपक्रम स्पर्धेसह इतर स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल अभ्यंकर हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.
अध्यक्षीय भाषणात आमदार ज.मो.अभ्यंकर म्हणाले की, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर असतो शिक्षक सेनेची ताकद वाढविण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुंबईतील अधिवेशनाला मराठवा ड्यातील शिक्षकांचा शंभर टक्के सहभाग अपेक्षित आहे, असे मत व्यक्त करत उपस्थित शिक्षकांच्या मनात उत्साहाचे नवीन पर्व निर्माण केले. तसेच अनेक शिक्षकांच्या अडीअडचणीचे निवेदने स्वीकारून ज्या काही असतील त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे परखड मत आमदार अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिलोली तालुका अध्यक्ष व पर्यावरण प्रेमी शिक्षक बालाजी गेंदेवाड यांनी केले तर आभार जिल्हा सचिव रवींद्र बंडेवार यांनी मानले.
ही बैठक यशस्वी होण्यासाठी, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका जि.प.व खाजगी शाळा पदाधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले.