प्रथमच यंदाचा शिवकृपा सहकार चषक 2025 च्या स्पर्धेत सातारा रॉयल्स संघाला विजेतेपद तर मुंबई मास्टर्स संघाला उपविजेते पद.
www.mjnewssatara.live

प्रथमच यंदाचा शिवकृपा सहकार चषक 2025 च्या स्पर्धेत सातारा रॉयल्स संघाला विजेतेपद तर मुंबई मास्टर्स संघाला उपविजेते पद.
पुणे.14.महाराष्ट्रातील आदर्श व अग्रगण्य अशा शिवकृपा सहकारी पतपेढीच्या वतीने शनिवार दि. 11 जानेवारी 2025 रोजी पुणे येथील स्टार स्पोर्टस अकॅडमी धायरी या ठिकाणी शिवकृपा सहकार चषक 2025 आंतरविभागीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता.
सातारा रॉयल्स व मुंबई 2 मास्टर्स या दोन संघांमध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यामध्ये सातारा रॉयल्स संघाने मुंबई 2 मास्टर्स संघाचा 38 धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सातारा रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये दिलेले 75 धावांचे आव्हान मुंबई 2 मास्टर्स यांना पेलवले नाही. त्यंाना 5 षटकात 7 गडयांच्या मोबदल्यात फक्त 36 धावाच करता आल्या. सातारा रॉयल्स संघाचे खेळाडू प्रताप निंबाळकर यांनी अष्टपैलू खेळीचे दर्शन घडवले. यामध्ये त्यांनी फलंदाजी करताना नाबाद 17 चेंडूत 47 धावा केल्या. तसेच गोलंदाजीमध्ये 8 धावा देत आघाडीचे 3 बळी मिळवले. या खेळीमुळे त्यांना सामनावीर किताबाने गौरविण्यात आले.
विजेत्या सातारा रॉयल्स संघाने प्रथम क्रमांकाचा चषक तसेच रोख रक्कम 15,551/- रूपयांचे बक्षीस पटकावले. उपविजेत्या मुंबई 2 मास्टर्स संघास व्दितीय क्रमांकाचा चषक व रोख रक्कम 11,551/- तसेच पुणे 2 रायडर्स संघास तृतीय क्रमांकाबद्दल चषक व रोख रक्कम रू. 7,551/- देवून गौरवण्यात आले.
स्पर्धेतील मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर तसेच मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज असे तीन पुरस्कार सातारा रॉयल्स संघाचे कर्णधार प्रताप निंबाळकर यांना त्यांच्या अष्टपैलू कामगिरीकरीता देण्यात आले. मालिकेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ठाणे स्ट्रायकर्स संघाचे फलंदाज दिपक शिर्के, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सातारा रॉयल्स संघाचे खेळाडू अमित पवार यांना गौरवण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी संस्थेचे सन्माननिय संस्थापक व अध्यक्ष मा. गोरख चव्हाण, संस्थापक व उपाध्यक्ष मा. चंद्रकांत वंजारी सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सहकाराला अध्यात्माची जोड देत शिवकृपा प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये एकजूटीची भावना निर्माण व्हावी, कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळे संस्थेच्या व्यवसाय वाढीसाठी मदत व्हावी तसेच कर्मचारी यांचे आरोग्य सदृढ व तंदुरूस्त रहावे या उदात्त हेतूने संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मत संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केेले. तसेच यापुढेहीे असेच नाविण्यपुर्ण उपक्रम संस्था नेहमी राबवत राहील असे उद्गार संस्थापक व उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत वंजारी यांनी व्यक्त केले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडलेबद्दल व उत्कृष्ट नियोजनाबद्दल पुणे क्षेत्रीय कार्यालय व पुणे विभागाचे यावेळी विशेष कौतूकदेखील करण्यात आले.