प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
एम.जे.न्युज. सातारा.

प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
एम.जे.न्युज. सातारा.
क्षेत्रकुसुंबी.दि.3. प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी येथे महिला मुक्ती दिन तसेच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या, पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सुंदर असे मार्गदर्शन केले आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत सावित्रीबाई फुले नसत्या तर आम्ही इथे नसतो असे मत महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे, आरोग्य सहाय्यक सतीश मर्ढेकर, सुधाकर बोधे, मंगल चौरे अश्विनी कांबळे, अल्फीया शेख, संदीप बनसोडे, डी.इ. ओ.नेहा चिकणे, प्रशिक्षक वृषाली शेडगे, शिवानी वेंदे,श्रीमती शेडगे, आदित्य वेंदे तसेच पत्रकार संजय वांगडे उपस्थित होते. सतीश मर्ढेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.