पंढरपूर येथील वारकरी धर्मशाळेच्या उभारणीसाठी महंत प्रयागगिर महाराजा कडून एक लाखाचा निधी सुपूर्द.
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

पंढरपूर येथील वारकरी धर्मशाळेच्या उभारणीसाठी महंत प्रयागगिर महाराजा कडून एक लाखाचा निधी सुपूर्द.
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.
नांदेड :- लोहा तालुक्यातील डोलारा येथील आनंदाश्रमाचे महंत गुरुवर्य प्रयागगीर महाराजांच्या अभिष्टचिंतन सोहळयात पंढरपूर येथे सुरू असलेल्या वारकरी धर्मशाळेच्या बांधकामासाठी महाराजांनी वारकरी परिवाराच्या उपस्थित एक लाख रुपयांची देणगी देत सामाजिक दायित्व कृतीतून दाखवून दिले.
डोलारा व तेलंगवाडीत महंत गुरुवर्य प्रयागगीर महाराजांचा आनंदाश्रम मठ आहे. दत्त संप्रदादायाचे अभ्यासक व प्रसारक म्हणून ते परिचित आहेत. सतत सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार घेत असतात. परिसरात मंदिर उभारणी, अन्नदान व गरजूंना मदत करणे असे सामाजिक कार्य करत असतात. तसेच त्यांनी भाविक भक्तांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त तेलंगवाडीत या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील वारकरी परिवाराचे भक्तगण सदस्य मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यात कापशी गुंफा मठाचे महंत गुरूवर्य देवगीर महाराज, रावसाहेब शिराळे बामणीकर, दत्तराम पाथरडकर, व्यंकटराव जाधव, शिवाजी पांगरेकर, गंगाधर भरकडे, संतोष कदम, दिनेश बामणीकर, मारुती पाटील, सतीश मंगलसांगवीकर सह अनेकांची उपस्थिती होती.