नारायण गडावरील अखंड हरिनाम सप्ताहाची ख्यातनाम संतांच्या रसाळ वाणीतून सांगता
एम.जे.न्यूज सातारा( प्रतिनिधी )वसंत सिरसाट

नारायण गडावरील अखंड हरिनाम सप्ताहाची ख्यातनाम संतांच्या रसाळ वाणीतून सांगता
एम.जे.न्यूज सातारा( प्रतिनिधी )वसंत सिरसाट
नांदेड :- दि.26, लोहा तालुक्यातील पिंपळदरी नारायण गड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह काल्याची सेवा ह.भ.प. गायनाचार्य शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांच्या रसाळ व सुश्राव्य गोड वाणीतून संपन्न झाली.
या सप्ताह निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक ह.भ.प.योगेश महाराज मोरे आहेरवाडीकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज किरडे चाटोरीकर, मृदंग वादक ह.भ. प.दत्ता महाराज सोलव, ह.भ.प.लक्ष्मण महाराज शिंदे, ह.भ.प.विणेकरी चांदबा पाटील करमाळेकर, चोपदार
ह.भ.प.माधवमामा अंचोलीकर यांची उत्तम सेवा लाभली तसेच या सप्ताह सांगता कार्यक्रमाला महंत 1008 श्री श्री श्री गुरुवर्य प्रयागगिर महाराज मठ संस्थान डोलारा, वै.मामासाहेब यांचे नातु ह.भ.प. कृष्णा महाराज मारतळेकर यांची तसेच प्रणिताताई देवरे (चिखलीकर) भास्कर पाटील ढगे, भास्करराव जोमेगावकर, ऊध्दव ढेपे, बाबुराव पाटील वडवळे, शंकर मालीपाटील, संजय वडवळे, ऊत्तमराव वडवळे , संगनवार सावकार, परमेश्वर गुरूजी घागरदरे, अनिल बेटकर व परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी उपस्थित होते. शेवटी महाप्रसादाचे सप्ताहाची सांगता झाली.