नांदेड येथे 5 जानेवारी रोजी मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन.
एम.जे.न्यूज सातारा,(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.

नांदेड येथे 5 जानेवारी रोजी मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन.
एम.जे.न्यूज सातारा,(प्रतिनिधी)वसंत सिरसाट.
नांदेड :- दि.3, मराठा वधूवर सूचक मंडळ नांदेडच्या वतीने 21 वा भव्य मराठा वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन दि. 5 जानेवारी 2025 रोजी हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर नांदेड येथे संपन्न होणार आहे. मागील 20 वर्षापासून मंडळाच्या वतीने अगदी मोफत हा वधूवर परिचय मेळावा घेतला जातो.
मराठा समाजातील विवाह इच्छूक वधूवरांना योग्य व अनुरूप असा जोडीदार निवडता यावा याच भूमिके तून हा परिचय मेळावा दरवर्षी घेतला जातो.
या वर्षीचा मेळावा दि.5 जानेवारी 2025 रोज रविवारी सकाळी 11वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार, आमदार यांचा हृदय सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.
मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर्व पक्षीय नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजाचा वेळ, पैसा, श्रम वाचावेत हीच प्रमुख भूमिका या मेळाव्याच्या आयोजनाच्या पाठीमागे आहे.
मराठा समाजाची सध्याची परिस्थिती पाहता अशा वधूवर परिचय मेळाव्याची समाजाला नितांत गरज आहे. समाजाची ही सध्याची गरज लक्षात घेऊन मागील दोन दशकापासून मराठा वधूवर सूचक मंडळाच्या वतीने हा उपक्रम मोफत राबवित येत आहे. समाजबांधवही यासाठी चांगला प्रतिसाद देत असतात. विवाह इच्छुक वधूवरांनी व त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या परिचयपत्रासह पूर्व नोंदणी हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर नांदेड येथे करावी, असे आवाहन मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे, सचिव प्रा.संतोष देवराये, उपाध्यक्ष इंजिनियर तानाजीराव हुस्सेकर, दिगंबरराव कदम, कोषाध्यक्ष एल.जी.पूयड, तसेच सन्माननीय सभासद शिवाजीराव खुडे, राजश्रीताई पाटील, कल्पनाताई डोंगळीकर आदींनी केले आहे.