नांदेड शहरात एकविसावा मराठा वधुवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न
नांदेड शहरात एकविसावा मराठा वधुवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी) वसंत सिरसाट

नांदेड शहरात एकविसावा मराठा वधुवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न
नांदेड :-दि 7, मराठा वधुवर सूचक मंडळ नांदेडच्या वतीने आयोजित एकविसावा भव्य मराठा वधूवर परिचय मेळावा हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर उद्योग समूहाचे उपाध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा सरकारी वकील अँड.बी.आर.भोसले हे होते, तर विशेष अतिथी म्हणून विधान परिषदेचे गटनेते हेमंत पाटील, माजी उपमहापौर आनंदराव पाटील चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक उमेश कदम, शिवाजीराव खुडे, इंजी शे.रा.पाटील, उद्धवराव सूर्यवंशी, नानाराव कल्याणकर, प्रा.व्यंकट माने, महेश मोरे, मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे, कल्पनाताई डोंगळीकर, अँड एल.जी पुयड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम, सतीशकुमार जाधव, प्रल्हादराव दुरपडे, शिवाजीराव पाटील, व्यंकटराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
मराठा सेवा संघाचे सचिव रमेश पवार यांनी जिजाऊ वंदना सादर केली. या प्रसंगी आ. हेमंत पाटील, नरेन्द्रदादा चव्हाण, बी.आर.भोसले, आनंदराव चव्हाण यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. या वधूवर परिचय मेळाव्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटका आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने नियोजीत वधूवर आणि त्यांचे पालक आले होते. या मेळाव्यात 750 वधूवरानी नोंदणी करून 300 जणांनी प्रत्यक्ष परिचय दिला.
मागील वीस वर्षापासून मोफत चालविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रा.संतोष देवराये यांनी केले तर सूत्रसंचालन साहित्यिक दिगंबर कदम यांनी केले व आभार इंजि. तानाजीराव हुस्सेकर यांनी मानले.