लोकशाही टिकवण्याचे काम पत्रकार करतात . पत्रकार भवनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू….! तहसिलदार – हणमंतराव कोळेकर
एम.जे.न्युज. सातारा.

लोकशाही टिकवण्याचे काम पत्रकार करतात .
पत्रकार भवनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू….!
तहसिलदार – हणमंतराव कोळेकर
एम.जे.न्युज. सातारा.
मेढा /दि.8.लोकशाही टिकवण्याचे व लोकशाही प्रकल्प बनवण्याचे काम पत्रकार करतात. प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना जावळी तालुक्यातील पत्रकारांची असल्याने शासकीय अधिकाऱ्यांना उत्तम काम करता येत आहे.गेल्या काही वर्षापासून तालुका पत्रकार भावनांचा प्रश्न प्रलंबित असून नवीन प्रशासकीय इमारत व अन्य जागेमध्ये त्यासाठी नक्कीच जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू .आपल्या काही अडचणी व प्रश्न असतील ते वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याचे काम निश्चित करू .असे आश्वासन जावळीचे तहसीलदार हनमंतराव कोळेकर यांनी दिले .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनचे औचित्य साधून तहसील कार्यालय. पंचायत समिती व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जावळी तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती जावळी ( मेढा ) च्या सभागृहामध्ये तहसीलदार हणमंतराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील. सपोनी अश्विनी पाटील .गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.जगताप ,नायब तहसीलदार श्री.मुनावळे ,संजय बैलकर ,जावळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर जावली पत्रकार संघाचे अध्यक्ष इम्तियाज मुजावर ,जेष्ठ पत्रकार नारायण शिंगटे,सुरेश पार्टे, संजय दळवी, रघुनाथ पार्टे, मोहन जगताप, विजय सपकाळ , भास्कर धनावडे , यांच्यासह तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी दोन्ही पत्रकार संघाचे पदाधिकारी ,सदस्य इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते .
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बोलताना गट विकास अधिकारी डॉ. निलेश पाटील म्हणाले ,जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत व प्रशासन जे काम करते त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात .शासन, प्रशासन व न्यायव्यवस्थेबरोबरच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ महत्वाचा आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र प्रथम सुरू केले त्यांच्या माध्यमातून जनतेच्या न्याय हक्क व प्रशासनाचा आवाज आपल्या लेखणीतून उठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श ध्येय ,धोरणा प्रमाणे आपण सर्वजण काम करता ही अभिमानाची गोष्ट आहे. पंचायत समितीच्या विस्तारित प्रशासकी इमारतीमध्ये पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल .असे आश्वासन त्यांनी यावेळी देऊन श्री पाटील पुढे म्हणाले ,जावळी तालुक्याला ऐतिहासिक, समृद्ध वारसा आहे .तो जतन करून आगळे वेगळे नावीन्य पूर्ण काहीतरी वेगळे करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू असे सुचित केले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार नारायण शिंगटे ,सुरेश पार्टे , विजय सपकाळ, इम्तियाज मुजावर ,भास्कर धनावडे प्रशांत गुजर, सादीक मुजावर आदी पत्रकारांनी आपल्या मनोगत अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या पत्रकार भावनांच्या इमारतीचा प्रश्न उचलून धरला .तर ग्रामीण पत्रकारांनाही शासकीय सुविधा मिळाव्यात याची मागणी सुरेश पार्टे यांनी केली . या प्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सर्वच शासकीय कार्यालयाच्या वतीने यथोचीत सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी अमित पवेकर यांनी केले तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी श्री जगताप यांनी मांडले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो
पत्रकारांचे समवेत तहसिलदार हणमंतराव कोळेकर, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील.