खेळाडू म्हणून यशस्वी होण्यासाठी ‘सातत्य’ महत्वाचे : दीपक पाटील-डांगे.
www.mjnewssatara.live

खेळाडू म्हणून यशस्वी होण्यासाठी ‘सातत्य’ महत्वाचे : दीपक पाटील-डांगे.
मेढा.दि.23.खेळाडूंना जर यशस्वी कारकीर्द आणि उज्वल भवितव्य अपेक्षित असेल तर खेळात सातत्य, कष्ट आणि चिकाटी अनिवार्य आहे असे मत बाळासाहेब देसाई महाविद्यालय पाटणचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. दीपक पाटील-डांगे यांनी जयवंत प्रतिष्ठान, हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महविद्यालय मेढा येथे व्यक्त केले. ते आमदार शशिकांत शिंदे महविद्यालय, मेढा येथील जिमखाना विभाग यांचे वतीने आयोजित राज्य क्रीडा दिन या विशेष कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात कै.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि दीप प्रज्वलनाने झाली.
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. पाटील यांनी खाशाब जाधव यांचे जीवन चरित्र यावर प्रकाशझोत टाकला. तसेच त्यांच्या जीवनतील काही प्रसंग कथन केले. या वेळी बोलताना त्यांनी खेळाडूंना यशस्वी होण्यसाठी काही कानमंत्र दिले. खेळात सातत्य आणि कष्ट याचे महत्व आधोरेखीत केले. तसेच स्वास्थ्य आणि शरीरभाषा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी खेळाडू विध्यार्थीना मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे देवून देशातील खेळाडुंचे महत्व आणि निरोगी आयुष्य याबाबत आपली भूमिका कथन केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. श्री प्रकाश जवळ यांनी करून दिला तसेच सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय धोंडे यांनी केले आणि प्रा. उल्हास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कानिष्ट आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थी उपस्थित होते.