जिज्ञासा चिकीत्सक वृती अंगी बाणून विद्यार्थ्यांनी संशोधक बनावे -शास्त्रज्ञ दिग्विजय वाडेकर.
एम. जे. न्यूज सातारा/राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.

जिज्ञासा चिकीत्सक वृती अंगी बाणून विद्यार्थ्यांनी संशोधक बनावे -शास्त्रज्ञ दिग्विजय वाडेकर.
एम. जे. न्यूज सातारा/राजू पवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड.
नांदेड:दि.2/1/ 2025.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्राकडे असल्याचे दिसून येत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी संशोधक,चिकीत्सक वृती अंगी बाळगून शास्त्रज्ञ बनावे असे आव्हान थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाई यांनी स्थापण केलेल्या जगातील तिस-या कमांकाचे विद्यापिठात कार्यरत तथा मराठवाडयाचे भूमीपुत्र शास्त्रज्ञ दिग्विजय शिवाजीराव वाडेकर यांनी केले. ते राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नांदेड येथे “शास्त्रज्ञ आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री बी एम हंगरगे हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव कदम, संस्थेचे सचिव चंद्रकांत सोनवणे, प्राचार्य श्री बालाजी हंगरगे, उपप्राचार्य श्रीमती निर्मला खुळे आदिजण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शास्त्रज्ञ दिग्विजय वाडेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कॉलेजचे अथवा माध्यमिक शिक्षण घेत असतानाच आय कॉड,सी.पी.ए. सारख्या परीक्षा दिल्या पाहिजेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उद्देश हा केवळ परीक्षा देणे हा नसून शिक्षण घेऊन चिकीत्सक,
संशोधक वृत्ती अंगी बाळगून शास्त्रज्ञ व्हावे आणि देशाची सेवा करावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री बालाजी हंगरगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.गोपाळराव कदम संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत सोनवणे यांचा शाळेचे सहशिक्षक श्री आनंद मोरे, श्री गोपाळ मोरे यांनी पुष्पहार देऊन सत्कार केला. तसेच शास्त्रज्ञ दिग्विजय वाडेकर यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, आभार एनसीसी विभाग प्रमुख डॉ. माणिक गाडेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यी आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.