दादापाटील राजळे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.
अहिल्यानगर प्रतिनिधी,-बाळासाहेब कोठुळे.

दादापाटील राजळे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन.
अहिल्यानगर प्रतिनिधी,-बाळासाहेब कोठुळे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दि वा.1जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत ”वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” या उपक्रमा अंतर्गत दादापाटील राजळे महाविद्यालयाचे ग्रंथालय विभागात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे . महाविद्यालयातील विद्यार्थी, अभ्यासक, सहितिक, पालक व नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे अवाहन प्राचार्य डॉ . राजधर टेमकर यांनी केले आहे.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कपिल जींतूर्कर यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, डॉ सुभाष देशमुख, डॉ. एम. एस. तांबोळी, डॉ. जे. एन. नेहुल,डॉ. जे. टी.कानडे, डॉ. आर. टी. घोलप, डॉ. के. जी. गायकवाड, ग्रंथपाल डॉ. राजकुमार घुले. डॉ. एस. डी. म्हस्के, डॉ. एन.आर. काकडे, डॉ. ए. आर चौरपगार, प्रा. ए . के . पाटोळे, श्रीमती. ए. एन. मरकड, प्रा. एस. एन.चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या पंधरवड्यात ग्रंथालय स्वच्छता, ग्रंथ वाचन, लेखक – विद्यार्थी सवांद, पुस्तकं प्रदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.