Uncategorized

बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या- किनवट येथे आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चात मागणी

एम.जे.न्यूज. सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या- किनवट येथे आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चात मागणी

एम.जे.न्यूज. सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट

नांदेड :- दि.19, नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका आदिवासी युवती सोबत येथील एका आरोग्य सेवकाने व इतर तिन नराधमाने दि.13 जानेवारी 2025 रोजी दराटी परिसरातील अभयारण्यात नेऊन बलात्कार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथे आदिवासी जनजाती समाजाने आक्रोष मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चा शहरातील हुतात्मा गोंडराजे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय या मार्गावरून असंख्य महिला व नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आला.

13 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथे आदिवासी जनजाती समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा दुपारी 1:00 वाजता काढण्यात आला. यावेळी किनवट शहर व गोकुंदा शहर व्यापारपेठ कडकडीत व्यापाऱ्यांनी स्वयंस्पुर्द बंद ठेवण्यात आले तर मोर्चा शांततेत संपन्न झाला. अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या असे नारे लावत आक्रोश मोर्चा हा गोंडराजे मैदान येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर- अन्नाभाऊ साठे- अहिल्याबाई होळकर- महात्मा फुले- छत्रपती शिवाजी महाराज- राष्ट्रमाता जिजाऊ व बिरसामुंडा सर्व महापुरूषांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करत मोर्चा थेट उपविभागीय कार्यालय येथे असंख्य महिला व जनतेच्या उपस्थितीमध्ये पोहचला आदिवासी समाज बांधव, युवती, युवक व महिलांचा व इतर समाजांचा ही आक्रोश मोर्चामध्ये समावेश होता. मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मंचावर आदिवासी नेते डॉ.आरतीताई फुपाटे, नीलिमाताई पट्टे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, के मुर्ती, प्रा. किशन मिरासे, संतोष मरस्कोले, बुलबुले, बोंबले, संजय सिडाम, अनिरुद्ध केंद्रे, प्रशांत कुलकर्णी, संतोष रायेवार, सुभाष वानोळे, रामेश्वर पराचे, दत्ता आडे, शशांक कनाके, सह अनेक नागरिकांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुकाराम पेंदोर, विश्वनाथ नखाते, रामकिशन टारपे, अनिल कनाके, मंगा गुडी सरपंच सूर्यभान किनाके, यांच्यासह आदिवासी जनजाती समाजाचा सहभाग होता. सभेमध्ये बोलतांना प्रवक्त्या डॉ.आरतीताई म्हणाले कि, आदिवासी महिलांनी स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे व अशा नराधमाच्या आमिषांना बळी न पडता मजबुत होऊन संघर्ष दिला पाहीजे, तर विदर्भ प्रांत अध्यक्ष। निलिमाताई पट्टे यांनी देखिल आदिवासींवर होत झालेल्या विविध अत्याचारांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली तर अशा घटना होऊ नये या करिता शासनाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली. सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.उत्तम धुमाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव कातले यांनी केले.सभा संपल्या नंतर आदिवासी महिला नेत्या व बांधवांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे यांना दिले निवेदनावर सुर्यभान किनाके, डॉ उत्तम धुमाळे, तुकाराम पेंदोर, रामकिशन टारपे, विश्वनाथ नखाते, अनिरुध्द केंद्रे, मारोती आडे, प्रा. किशन मिरासे, गोपिनाथ बुलबुले, प्रशांत कुलकर्णी, डॉ सुभाष वानोळे, रामेश्वर परचे, संजय सिडाम, शशांक कनाके, दत्ता आडे, संतोष म्हरसकोल्हे, आनंद मच्छेवार, सुरेश साकपेल्लीवार, जितेंद्र कुलसंगे, संतोष कनाके यांच्या सह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button