
अल्पभूधारक शेतकऱ्यांची सेंद्रिय भाजीपाला निर्मिती.
एम.जे.न्युज. सातारा.
परळी.दि.4.सातारा पश्चिमेच्या सह्याद्री डोंगरकडायला लागून असणारा परळी परिसर म्हणजे सज्जनगडाचा पायथा पूर्वीपासून अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय सरासरी शेतीचे क्षेत्र 10 ते 12 गुंठेपर्यंत येते,अश्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सोबत अवॉर्ड संस्था वेगवेगळ्या विषयावरती काम करून या भागातील शेती जिवंत ठेवणे आणि अल्पशेती मधून चांगले उत्पादन आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. खडगाव,यादववाडी, सुतारवाडी, ब्राह्मणवाडी, बनघर, कुस बु., कुस खुर्द, कासारथळ या गावांमध्ये मिश्र आंतरपीक भाजीपाला निर्मितीसाठी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, सेंद्रिय निवेष्ठा निर्मिती त्याचबरोबर रोपे,बियाणे, खते आणि उपलब्ध सेंद्रिय निविष्ठा वापरून भाजीपाला निर्मिती केली जात आहे. या गावांमधून या 15 शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे यामध्ये प्रामुख्याने वांगी, टोमॅटो, मिरची, बटाटा, कांदा, लसूण, मेथी, पालक, पोकळा, कोथिंबीर, मुळा, बीट, ढेंच्या, तांदळी, कारले, दोडका, काकडी, तोंडले या भाज्या व खरीप हंगामात येणारा पौष्टिक खपली गहू, देशी हरभरा, सूर्यफूल,मोहरी अशा पिकांची लागवड केली आहे. संस्थेने शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीसाठी मदत म्हणून “गुड फूड्स” उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून हा पिकवलेला भाजीपाला सातारा शहरातील पहिल्या टप्प्यात मोजक्याच ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुरू केली. संस्थेच्या सचिव Ad. निलिमा कदम यांनी यावेळी सांगितले की सध्या आपण मोजक्या प्रमाणातच विषमुक्त अन्न निर्मिती करत असल्याने विक्री होणारा उत्पादित होणारा शेतीमाल हा मोजक्याच ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होत आहोत. भविष्यात या भागामधील कष्टाळू अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा प्रयोग यशस्वी करून मोठ्या प्रमाणात विषमुक्त अन्न निर्मितीसाठी प्रोस्ताहीत करून शहरातील लोकांना चांगला विषमुक्त स्वच्छ व ताजा भाजीपाला पुरवठा आठवड्यातून एकदा पोहोच करण्याचे उद्दिष्ट संस्थेचे माध्यमातून करण्यात येत आहे. तर प्रकल्प संचालक किरण कदम सर यांनी संस्थेच्या माध्यमातून हा नवीन उपक्रम घेत असल्याने ग्राहकांना त्यांची विश्वासार्थापटण्यासाठी स्वतःहून या भाजीपाला व तृणधान्य प्लॉटला भेटी देऊन खात्री करून घेता येणार आहे असे सांगितले. या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन,प्रत्यक्ष लागवडी करून घेणे,निविष्ठा निर्मिती, निवेष्ठाव्यवस्थापन, आलेले उत्पादन विक्री ही व्यवस्था प्रकल्प समन्वयक शरद कोळी पाहत आहेत.