
आई-वडीलांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही.बंडातात्या कराडकर.
जवळवाडी.दि.13.राष्ट्रमाता जिजांऊंच्या संस्काराने छ.श्री शिवाजी महाराज घडले.स्वराज्य उभे राहिले.छ.शिवाजी महाराज यांचे राजमाता जिजाऊंवर अत्यंत प्रेम होते म्हणूनच त्यांनी आपल्या मातेची सुवर्ण तुला केली.आज समाजात संस्काराचा अभाव असून अनेक शैक्षणिक समृध्दी आलेल्या कुटुंबातील आई-वडीलांना वृध्दाश्रमात रहावे लागत आहे हे दुर्देवी असून शेतकरी व वारकरी कुटुंबात मात्र आई-वडीलांची काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते याचे कारण संस्कार हेच आहे. आई-वडीलांच्या ऋणातून जन्मोजन्मी उतराई होणे शक्य नसल्याचे मत बंडातात्या कराडकर यांनी व्यसनमुक्त युवक संघाच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले आहे.
जवळवाडी ता.जावली येथे आयोजित महिला- युवती-युवक मेळावा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.सुरवातीला सामाजिक कार्यकर्त्या मा.उर्मिला कदम यांचे स्त्री जन्माची कहाणी या विषयावर व्याख्यान झाले.महिलांच्या जीवनात येणारे अनेक प्रसंग त्यांनी यावेळी विषद केले. मा.जगन्नाथ शिंदे(कोपर्डे) यांचे लेकराची यशोगाथा आई या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.त्यानंतर मातृपंढरी संघर्ष माता सन्मान पुरस्कार जयश्री गणेश माजगांवकर यांना ॲड.वर्षाताई देशपांडे यांचेहस्ते देण्यात आला. यावेळी बाबामहाराज गजवडीकर, मदंगराव कदम,ॲड.शिवाजीराव मर्ढेकर,विजय शेलार,पांडूरंग जवळ,दत्ता पवार,व्यसनमुक्त संघाचे अध्यक्ष दिपक जाधव, गवळी सर इ.मान्यवर व व्यसनमुक्त संघाचे महाराष्ट्रभरातून शेकडो कार्यकर्ते,महिला उपस्थित होते.
यावेळी मातोश्री पार्वती शंकर जवळ व जेष्ठ वारकरी ह.भ.प.नामदेव आण्णा वाघमळे(कण्हेर) यांची पंचधान्य व गुळ तुला करण्यात आली. हे धान्य राष्ट्रबंधु राजीवजी दीक्षित गुरूकुल या संस्थेला देण्यात आले.ॲड.वर्षाताई देशपांडे या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी म्हणाल्या पुरूष अनेक व्यसन करतात पण भोगावे लागते स्त्री लाच. पुरूष टेंशन आले की,आत्महत्या करतो पण बाई बिचारी आयुष्यभर सगळं सोसत आपल्या लेकरांसाठी,कुटुंबासाठी कष्टत रहाते कारण ती आई असते.व्यसनमुक्त संघाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक लकडे यांनी केले तर आभार विलासबाबा जवळ यांनी मानले.