आ.च.विद्यालय व आदर्श कॉलेज व महामार्ग सुरक्षा पथक यांच्या वतीने सुरक्षा जागरूकता रॅली संपन्न.
एम.जे.न्युज. सातारा. कराड प्रतिनिधी राहुल पवार.

आ.च.विद्यालय व आदर्श कॉलेज व महामार्ग सुरक्षा पथक यांच्या वतीने सुरक्षा जागरूकता रॅली संपन्न.
एम.जे.न्युज. सातारा. कराड प्रतिनिधी राहुल पवार.
कराड.दि.7.महामार्ग सुरक्षा पथक व पोलीस मदत केंद्र तसेच आ.च.विद्यालय व आदर्श जुनिअर कॉलेज यांच्या वतीने मलकापूरमध्ये रस्ता सुरक्षा जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सुमारे 450 विद्यार्थी, पालक, पोलीस कर्मचारी,आर एस पी व एनसीसी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. रॅली संपूर्ण मलकापूर गावातून काढण्यात आली होती. या रॅलीचा सांगता समारंभ आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे API श्री अतुल लोखंडे म्हणाले, की वाहनांचे अपघात हे मानवी चुकांमुळे होत असतात.यामध्ये वाहन नादुरुस्ती, वाहतूक नियमांचे पालन न करणे, कमी वयात भरधाव गाडी चालवणे. अशा मानवी चुकांमुळे हे अपघात होतात. या चुका टाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.
अशोक सिंग यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या सांकेतिक चिन्हांची माहिती देऊन प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.के. राठोड यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सविता पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांंचे आभार विभाग प्रमुख सौ शीला पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री अशोकराव थोरात होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी.थोरात,पर्यवेक्षक बी.जी. बुरुंगले,जे एन कराळे,एन.सी. सी. विभाग प्रमुख श्री प्रमोद खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.