10 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या शिक्षक सेनेच्या अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : आमदार अभ्यंकर
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी) वसंत सिरसाट

10 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या शिक्षक सेनेच्या अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : आमदार अभ्यंकर
एम.जे.न्यूज सातारा(प्रतिनिधी) वसंत सिरसाट
नांदेड :- दि.22, शिक्षकांवरील अन्याय व शासन स्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नांबद्दल असलेल्या त्रुटी बद्दल शासन निष्क्रिय असून शिक्षकांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठविण्यासाठी दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या मुंबई येथे होणाऱ्या शिक्षक सेनेच्या अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर यांनी नांदेड येथील अधिवेशन पूर्वतयारी बैठकीत आवाहन केले आहे.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जेष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, एस.टी.कामगार सेनेचे प्रकाश मारावार, राज्य कोषाध्यक्ष सुधाकर पा. कापरे, राज्य उपाध्यक्ष विठू भाऊ चव्हाण, मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, सचिव भाऊसाहेब वावूळ उपस्थित होते.
पुढे बोलताना अभ्यंकर म्हणाले की, निष्क्रीय सरकार विरुद्ध आवाज उठविण्याची आता वेळ आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नाही, मुंबई येथील शाळेत सातशे सातशे शिक्षक असलेल्या शाळेत केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. संच मान्यता देण्यास सरकार हे असमर्थ आहे. पहिल्यां क्रमांकावर असलेले राज्य आता सातव्या क्रमांकावर गेलेले आहे. कंत्राटी शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात सरकारने कोणतेही पाऊल उचललं नाही. 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना पेंशन लागू करावे. नागपूर अधि वेशनात आपण वेगवेगळ्या दिवशी सात वेळा आवाज उठविला. सरकारने मात्र थातूर माथूर आश्वासने दिली. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
शिक्षकांच्या एकजूटीसाठी १० फेबुवारी रोजी मुंबईत अधिवेशन आहे. त्यासाठी मराठवाडयातून जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. अभ्यंकर यांनी केले.
यावेळी माजी आ.रोहिदास चव्हाण, एस.टी कामगार सेनेचे प्रकाश मारावार यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचलन बालाजी गेंदेवार, काशिनाथ शिरसीकर यांनी केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण यांनी आ. अभ्यंकर यांचा खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
तसेच ही बैठक यशस्वी होण्यासाठी राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष- परसुराम यसलवाड, जिल्हाध्यक्ष- तानाजी पवार, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष- मुस्तफा शेख, सचिव- रवि बंडेवार, कार्याध्यक्ष- गंगाधर कदम, मनोहर भंडेवार, श्रीरंग बिराजदार आविनास चिद्रावार, प्रकाश कांबळे, बालाजी गेंदेवार, काशिनाथ सिरसीकर, अनिरुद्र सिरसाळकर, रविराज जाधव, महिला प्रतिनीधी सुकन्या खांडरे, शिवकन्या पटवे, शोभा गिरी, ज्योतीताई शिंदे, संभाजी पवार, प्रकाश फुलवरे, संभाजी पवार, पुंडलीक कारामुंगे, सुनिल यनलोड, बस्वराज मठवाले, देविदास जमदाडे, बालाजी भांगे, शिवकुमार निलगीर, आनंद सुर्यवंशी, प्रमोद देशमाने, नारायन लोखंडे, आकाश राजुरे, सतिश धोंडगे, बालाजी राजुरे, तुकाराम बोईनवाड, रामदास देशमुख, गोपाल बंड्रेवार, दत्ता पेंडारकर, रमन काब्दे, प्रसिद्धी प्रमुख दक्षिण- वसंत सिरसाट, प्रसिद्धी प्रमुख उत्तर- राजू पवार, अनिल गवंडगावकर, बल्लाळ, अशोक राठोड, विठ्ठल बुरुरे, मोमीन शेख, बालाजी केंद्रे, पुरुषोत्तम मोतेवार, राजश्री चौहाण, यासह जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी जि.प.व खाजगी शाळा उपस्थीत होते