
व्यथामय फुललेला संघर्ष.
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे दि.30.प्राध्यापक सन्मा. कांबळे सर रा. शिर्डी हे आज अनंतात विलीन झाले आहे. कांबळे सर हे सोमय्या कॉलेज कोपरगाव या कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीव संपन्न असलेले अतिशय सृजनशील प्रेमळ असे हे व्यक्तिमत्व होते. बालपणा पासूनच कांबळे सरांच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष आला . आई वडील पाच भाऊ एक बहीण असं हे अतिशय गरीब कुटुंब… पण आपल्या गरिबीतही त्यांनी बालपणापासूनच जीवनाच्या प्रवासातला संघर्ष चालू ठेवला. व त्या संघर्षमय जीवनामध्ये सुद्धा त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं प्रथम ते कॉलेज मध्ये शिपाई म्हणून नोकरीला लागले. शिपायाच्या नोकरीमध्ये सुद्धा प्रचंड संघर्ष त्यांना तिथे करावा लागला. त्यांनी अगदी प्रामाणिकपणे कॉलेज मध्ये काम केले. त्याच बरोबर त्यांनी कॉलेजच्या प्रांगणा मध्ये अनेक प्रकारची झाडे लावली. त्या झाडांना वेळोवेळी खत पाणी दिलं. आगदी लहान मुलांप्रमाणे त्यांचे संगोपन केलं. आणि ती झाडं जशी जशी मोठी होत होती. तसे तसे कांबळे सर स्वतः आपलं पुढील उच्च शिक्षणही शिपायांची नौकरी करत करत घेत होते. पाचसहा वर्षात झाडे चांगली मोठी झाली बहरली.त्याच प्रमाणे कांबळेसरांचेही उच्च शिक्षण पूर्ण झाले.आणी कोनाचाही वशिला नाही…फोन नाही… चिठ्ठी चौपाटी नाही… केवळ शिपाई पदावर असतांना प्रामाणिकपणे केलेले काम. शिष्टाचाराने व लिनता नम्रतेने गुरुजन वर्गासह कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यांच्याशी वर्तन व प्रेमाळू आनंदाळू मायाळू कनवाळू सुसंवाद ह्या सर्व बाबींची दखल कॉलेजच्या मॅनेजमेंट ने घेऊन कांबळे नावाच्या ह्या प्रमाणीक शिपायास…..त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू करून घेतले. व कांबळे शिपयाचा प्राध्यापक काबंळेसर झाले. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि हा संघर्ष प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये केलाच पाहिजे. संघर्ष करतानी कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये.
हा एक प्रकारचा संदेशच त्यांनी समाजासाठी प्रत्यक्षात दिलेला आहे असे मला वाटते.
सकारात्मक विचारसरणी व प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ती एक पावतीच होती. शिपाई असताना ते सर्वांशी अतिशय प्रेमाने, नम्रतेने ,आपुलकीने व चांगुलपणाने विद्यार्थ्यांसह सर्व गुरुजन वर्गाशी ते वागत होते.एक प्रकारे सर्वांशी त्यांचे प्रेमाचे नाते निर्माण झाले होते.त्यामुळे कॉलेजचे सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी यांचे ते खूप आवडते होते. आणि म्हणूनच…. जेव्हा ते प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांना शिकवण्या साठी वर्गामध्ये जात असत… तेव्हा सर्व विद्यार्थी टाळ्या वाजवूनच त्यांचे स्वागत करत असत. त्यांची शिकवण्याची पद्धत सुध्दा अतिशय आगळी-वेगळी होती .अवघड विषय सुद्धा ते अतिशय सोपा करून शिकवत असत. शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ते मानवता संवर्धन निसर्ग संवर्धन व ब्रम्हांडा मधील अनेक बारकावे तसेच साहित्य कला व संस्कृती या क्षेत्रातीलही बारकवे ते समजावून सांगत होते .त्यामुळे मुलांचे ते खूप आवडते असे प्राध्यापक बनले होते. प्रा.कांबळेसरांनी सेवानिवृत्तीच्या नंतर आपलं पूर्ण आयुष्य मानवता व निसर्ग संवर्धन तसेच सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले होते.प्रा. कांबळे सरांबरोबर माझे खूप वर्षापासूनचे अतिशय प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. त्याचं कारण म्हणजे त्यांचा गोड सुस्वाभाव. प्रेमाळू आनंद आळू व कनवाळू असं वागणं. आभ्यास पूर्ण वकृत्व होय. तसेच ते माझ्या लहान भाऊजाईचे सौ. आशा सोनवणे हिचे सख्खे मामाही होते. त्यामुळे नाते संबंधातूनही माझ्या कुटुंबियांसाठी ते फार जवळचेच होतो. मी जेव्हा कोपरगाव येथे एस एच जी एम कॉलेजमधे तीन वर्षांपूर्वी व्याख्याना साठी गेलो. त्या वेळेस मी कॉलेजच्या भव्य प्रांगणा मध्ये खूप मोठ-मोठी वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहिली.व अवचंबीत झालो.त्या झाडांबद्दल मला खूप उत्सुकता वाटली. कॉलेजचे प्राचार्ययांना व इतर काही प्राध्यापक मित्रांना झाडांबाबद विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले की , ही सर्व झाडे आमच्या कॉलेजला पहिल्यांदी शिपाई म्हणून असलेले व नंतर याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालेले आदरणीय प्रा.कांबळे सर यांनी ते शिपाई असतांनी लावलेले आहेत. मला फार विशेष वाटले. आणि कांबळे सरांच्या बद्दल खूप मोठा गर्व व अभिमान वाटला. निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या या अवलियाबद्दल मनामध्ये एक वेगळाच अदरभाव निर्माण झाला. त्या दिवशी मी माझ्या व्याख्याना मध्ये आवर्जून आदरणीय प्राध्यापक कांबळे सरांबद्दल व त्यांच्या निसर्गसंवर्धन कार्य बाबद भरभरून बोललो. कांबळे सर सध्या शिर्डी मध्ये स्थायीक झाले होते .शिर्डी मध्येच त्यांची दोन्ही संदिपदादा व सुहासराव हे शिर्डी सारख्या ठिकाणी उत्तम व्यावसायिक आहेत. शिर्डी सह पंचक्रोशीतील समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा व आदरभावा कांबळे सरांच्या मुलांनी निर्माण केलेला आहे.हे कौतुकास्पद आहे.शिष्टाचाराचे बाळकडू कांबळे सरांनी कुटुंबातील आपल्या मुलांसह आपले पुतणे, आपली भाची ,भाचे या सर्वांना दिल्यामुळेच की काय आज त्यांचे मुलं ,पुतणे भाचे, भाची व नातवंडे ही सर्व गोतावळ्यातील माणसं अतिशय तरळ अंतकरणाने समाजामध्ये वावरतात. समाजामध्ये मानवता संवर्धन करताना दिसतात. कारण त्यांचे गॉडफादर होते कांबळे सर…. मी अनेक वेळा शिर्डीमध्ये कांबळे सरांना भेटावयास गेलो. त्यांच्याशी अनेक वेळा अनेक विषयांवर मुक्त साधयचो.ते खुप भरभरुन संवाद करायचे. सरांना जुने लोकगीते ऐकावयास फार आवडायची.विषेशताहा खानदेशातील लोकगीते खानदेशातील पोवाडे हा त्यांचा आवडीचा विषय. आणि त्या अनुषंगाने ते माझ्याशी सतत चर्चा करायचे. साहित्य कला आणि संस्कृती याचे ते खऱ्या अर्थाने उपासक होते. ते चांगले वाचकही होते. आपण सुशिक्षित माणसं समाजाचे काहीतरी देणेदार लागतो आहोत. म्हणून आपण समाजाला ज्ञान दिले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा आपण दूर केली पाहिजे.व तळागाळातील लोकांबरोबर आपण सततच संवाद साधत राहिला पाहिजे. असे ते आवर्जून म्हणायचे. “आदरणीय माजी प्राध्यापक कांबळे सर हे आज दि. २७ /१२/ २०२४ रोजी दुपारी अल्पशा आजाराने साईंच्या पावनभुमीत शिर्डी येथे अनंतात विलीन झाले.” बाबत माझे बंधुराज गोरक्ष (नाना) सोनवणे यांनी फोन करून कळवले. आणि माझे अंतकरण पिळवटून गेले.आदरणीय कांबळे सरांना मी आदराने मामा म्हणायचो. कांबळे मामांच्या जाण्याने माझ्या अंतकरणांमध्ये खूप खोलवर विरहाचे विवर निर्माण झाले आहे. आज त्यांचा हसतमुख चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये.कांबळे सरांच्या जाण्याने पंचक्रोशीतील समाजाची खऱ्या अर्थाने एक वैचारीक हानी झाली आहे. असे मी म्हणेल….
सरांचे सौभाग्यवती जयवंता मामी, मुले संदिप,सुहास सह सर्व नातेवाईक व आप्त यांना हे दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो.
आदरणीय सरांच्या आत्माचा त्रिमितीय पोकळीतील अनंत कोटी ब्रम्हांडातील प्रवास सुखमय होवो. ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
कांबळे सरांना माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
सर,
“तुम्ही दिवे पांघरूणी आला
अंधार भरल्या काळराती
खडकांना फोडूणी पाझर
तुम्ही त्यात लावल्या ज्योती
वंदितो तुम्हाला आमचा
हा भक्तीने भारला भाव
ह्या समाज पंढरी मधले
तुम्ही हृदय-मनातील देव”
सुभाष सोनवणे, अ.नगर
(साहित्यिक / व्याख्याते)
९८६०१५९४९१