सामाजिक प्रदूषण धोकादायक पातळीवर – श्रीधर नांदेडकर.
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे.
सामाजिक प्रदूषण धोकादायक पातळीवर – श्रीधर नांदेडकर.
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे.
दि.27.साने गुरूजी हे कवींचे प्रेरणास्थान आहेत. गुरूजींनी घालून दिलेली मूल्ये, जीवनसुत्रे ही सर्वांसाठी मार्गदर्शक असून त्यांचा झालेला र्हास हेच त्यांच्या शेवटाचे कारण ठरावे ही शोकांतिका आहे. सर्वांना धीर व अनाथांना साथ देणे ही गुरूजींची शिकवण हल्ली सर्रास पायदळी तुडवली जातेय त्यामुळे सामाजिक आणि राजकीय जीवन प्रचंड प्रदूषित झाल्याचे मत साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य तथा म.सा.प.च्या प्रतिष्ठान मासिकाचे संपादक मा.श्रीधर नांदेडकर यांनी व्यक्त केले. साने गुरूजी जयंतीनिमित्त एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित 34 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या उद्घाटक पदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अहिल्यानगर येथील प्रसिद्ध कवीवर्य डाॅ.संजय बोरूडे होते.
एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, युवक प्रदेश सरचिटणीस बलराम मनिठे, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, परभणी जिल्हा उपाध्यक्षा मेघा नांदखेडकर, महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकताचे पाथर्डी तालुकाध्यक्ष राजेंद्र उदारे यांनी ‘मी मराठी शाळा बोलते’ व लोकशाहीचा उत्सव झाला’ या दर्जेदार रचना सादर केल्या. यानंतर शाजापूर (मध्यप्रदेश) येथील जेष्ठ कवयित्री कविता पुणतांबेकर यांच्या ‘वर्षाव चांदण्यांतचे पडले कसे कळेना’ ही गझल व ‘मित्र’ या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकताचे राहुरी तालुका प्रतिनिधी बाळासाहेब मुंतोडे यांनी ‘आठवणींचा ठेवा’ व ‘गाव’ या एकसे बढकर एक कविता उपस्थितांना ऐकवल्या. कवी प्रकाश पाठक यांनी ‘आनंदाची परिभाषा’ आणि ‘मी यशाला विचारतोय’ या रचना पेश केल्यानंतर एकताचे नेवासा तालुकाध्यक्ष मोहिनीराज होन यांनी ‘शेतकरी बाप’ व ‘कोकण’ या रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या कविता उपस्थितांना ऐकवल्या. एकताचे शेवगाव तालुका प्रतिनिधी अण्णासाहेब तहकीक यांनी ‘मन माझे मोकळे’ ही वेगळ्या धाटणीची कविता सादर केली. ‘पुस्तक’ ही नागेश बोंतेवाड यांनी सादर केलेली रचना व ‘न सांगताच कळावे’ ही उमकांत आदमाने यांची रचना उत्कृष्ट होत्या. रोशनकुमार पिलेवान यांची गांधी एक आंदोलन’ ही कविता भाव खाऊन गेली. बीडचे कवी संजय राठोड यांनी ‘कंपनी’ आणि जामखेड चे कवी परशुराम नागरगोजे यांनी ‘टेलर’ ही रचना पेश केली. यावेळी एकताचे देविदास शिंदे यांनी ‘स्थापिले मी तुला’ ही दर्जेदार रचना श्रोत्यांना ऐकवली. कवयित्री अनिता वलांडे (लातूर) यांनी बहारदार सूत्रसंचालन करत ‘वाह रे पावसा’ ही अवकाळी अन् सरकारी मदतीवर टीकात्मक भाष्य करणारी रचना सादर केली.
या काव्य संमेलनात एकताच्या पदाधिकाऱ्यांसह विविध जिल्ह्यांतील कवी कवयित्री, रसिक श्रोते सहभागी होते.