नवलाई देवी सामाजिक सेवा संस्था (रजि) सोनाट ,मुंबई यांच्या वतीने सन.2025 प्रथमच दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न.
एम.जे.न्युज. सातारा.

नवलाई देवी सामाजिक सेवा संस्था (रजि) सोनाट ,मुंबई यांच्या वतीने सन.2025 प्रथमच दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न.
महाबळेश्वर. दि.30.नवलाई देवी सामाजिक सेवा संस्था (रजि) सोनाट मुंबई यांच्या वतीने आयोजित राकेश कदम यांच्या संकल्पनेतून प्रथम दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२५ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला बाबूरावदादा संकपाळ ( महाबळेश्र्वर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ह.भ.प. कोंडिराम महाराज शिंदे, अध्यक्ष १०५ गाव समाज ( कुरोशी), सुभाषशेठ कदम उद्योजक, ( तापोळा) गणेश उतेकर, महाबळेश्र्वर तालुका शिवसेना संघटक महादेव शिंदे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाबळेश्र्वर, विशाल सकपाळ उपजिल्हाप्रमुख युवासेना सातारा, आनंद धनावडे चेअरमन शिवसागर बोट क्लब तापोळा. विठ्ठल धनावडे उद्योजक तापोळा. राम सकपाळ उपतालुकाप्रमुख महाबळेश्र्वर, रमेश कदम रामेघर, पांडूरंगबुवा जाधव, शंकर जाधव सौंदरी. दीपक शिंदे कुरोशी, रामचंद्र सावजी कदम सामजसेवक सोनाट. उपाध्यक्ष १०५ गाव समाज सुभाष शिंदे, सरपंच पांडुरंगदादा कदम मा. सरपंच/ उद्योजक सोनाट कोंडिबा कदम, कार्याध्यक्ष प्रकाश कदम, अध्यक्ष सुनिल कदम, उपाध्यक्ष विठ्ठल कदम, सचिव अशोक मारूती, कदम उपसचिव सुभाष कदम, खजिनदार शांताराम कदम उद्योजक सोनाट, नवलाई देवी सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ मंडळ सोनाट, महिला मंडळ सोनाट. आदी मान्यवर उपस्थित होते.