मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर.
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी)वसंत सिरसाट

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर.
एम.जे.न्यूज सातारा (प्रतिनिधी)वसंत सिरसाट
नांदेड :- दि.31 मराठा आरक्षणाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दि.1 जानेवारी 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुधवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असून जरांगे पाटील हे श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी माळेगाव येथेही जाणार आहेत.
मनोज जरांगे पाटील हे बुधवार दि.1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कंधार तालुक्यातील बहाद्दरपूरा येथे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार- आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आयोजित किर्तन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तद्नंतर दुपारी 1 वाजता त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोहा येथे सत्कार होणार आहे. तसेच दुपारी 1:30 वाजता मराठा आरक्षण संवाद बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते श्री क्षेत्र माळेगाव येथे श्री खंडोबा देव दर्शनासाठी ते दुपारी 3 वाजता जाणार आहेत.