माळेगाव यात्रेसाठी 30 डिसेंबर रोजी सुट्टी देण्याची शिक्षक सेनेची मागणी.
एम.जे.न्यूज, सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट.

माळेगाव यात्रेसाठी 30 डिसेंबर रोजी सुट्टी देण्याची शिक्षक सेनेची मागणी
———————————————-
एम.जे.न्यूज, सातारा (प्रतिनिधी) वसंत सिरसाट
———————————————-
नांदेड.दि.27 :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेनिमित्त दि.30 डिसेंबरला लोहा तालुक्यातील शाळेला सुटी जाहीर करण्यासाठीच्या मागणीचे निवेदन शिक्षक सेनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष विठू भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोहा तहसीलदारांना देण्यात आले.
माळेगाव यात्रेनिमित्त दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक दिवसाची सुटी जाहीर केली जाते. परंतु 2024 या वर्षात माळेगाव यात्रा दोन वेळा आली असल्यामुळे यंदाही डिसेंबर महिन्यात येत असल्याने माळेगाव यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुटी दिली नाही.
सदरील माळेगाव यात्रा अत्यंत महत्त्वाची असून दक्षिण भारतातील लाखो लोकांचा यात्रेत
सहभाग असतो. यात शैक्षणिक, कृषीविषयक, स्वच्छता, आरोग्य व पशू प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर भरतात. यातून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून बौद्धिक मेजवानी प्राप्त होते. त्यामुळे या बाबींचे महत्त्व, उपयोगीता लक्षात घेता आपल्या स्तरावरून माळेगाव यात्रेसाठी दि. 30 डिसेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात्रेचा लाभ घेता येईल, अशा आशयाचे निवेदन शिक्षकांच्या वतीने उपस्थित नायब तहसीलदार पाठक यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देताना शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठू भाऊ चव्हाण, तालुकाध्यक्ष संभाजी पवार, संभाजी केंद्रे, सुभाष राठोड, सुरेश पांचाळ, डी.बी.वडवळकर, डी.एस.गादगे आदी उपस्थितीत होते.