कराड मलकापूर परिसरातील कॅफे पोलिसांच्या राडारावर

कॅफेत अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलांसह कॅफे चालकांवर पोलिसांची कारवाईचा बडगा
कराड सातारा प्रतिनिधी राहुल पवार
कॅफेत अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलांसह कॅफे चालकांवर पोलिसांची कारवाईचा बडगा
कराड सातारा प्रतिनिधी राहुल पवार
शुक्रवारी कराड येथील उपविभागीय पोलीस पथकाने कराड मलकापूर परिसरातील कॅफेवर कारवाईचा धडाका लावला उप अधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके तयार करून त्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली. यावेळी मलकापूर परिसरातील अनेक कॅफे नियमांचे उल्लंघन करताना निदर्शनास आल्याने पोलिसांनी कॅफे मालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.
तसेच अश्लील कृत्य करणारी अनेक जोडपी ही पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहेत. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वारंवार सूचना देऊनही प्रेमी युगलांना आडोशाची जागा करून देणाऱ्या कॅफे चालकांना व मालकांना कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कराड शहर पोलिसांची सुरू आहे. अवघ्या दोन तासाच्या कारवाईत दहा कॅफेवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे .कराड मलकापूर परिसरात आडोशाला सेवा रस्त्यालगतच्या कॅफेची संख्या वाढली असून या ठिकाणी प्रेमी युगल अश्लील चाळे करताना निदर्शनास येत आहेत.
यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाच वेळी चार पथकाकडून कारवाई करण्याची व्य ह रचना आखली होती. एकाच वेळी कारवाई झाल्यामुळे कॅफे चालकांची अक्षरशा दाना दन उडाली होती. यापुढेही अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या कॅफेवर अशीच कारवाई सुरू राहील असे सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कुडकर यांनी सांगितले आहे.