Uncategorized

जागतिक वारसा स्थळ असलेले कासपठार कार्यकारी व्यवस्थापन समितीचे सन. 2025 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न.

जागतिक वारसा स्थळ असलेले कासपठार कार्यकारी व्यवस्थापन समितीचे सन. 2025 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न.

कुसुंबी, दि. 28,जागतिक वारसा स्थळ असलेले कासपठार कार्यकारी व्यवस्थापन समितीचा सन.2025 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न.
महाराष्ट्रतील ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये विविधरंगी रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले ‘कास पठार’ या पठाराला कास पुष्प पठार असे ओळखले जाते. सन २०१२ साली या ठिकाणाला युनेस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. वर्ल्ड हेरिटेज पश्चिम घाटातील ३९ ठिकाणांपैकी हे एक आहे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगेत जैवविविधतेने नटलेले हे कास पठार म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल ठेवा आहे. कास पठार हे सातारा शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर आहे. कास पठाराची उंची समुद्रसपाटीपासून १२४० मीटर आहे. कास पठारावर ३७५ फुलांच्या प्रजाती ४७ दुर्मिळ प्रजाती व ९८ प्रजाती फक्त पश्चिम घाटात आढळतात.
कासपठार म्हणून सार्‍या जगभरात ख्याति आहे. अशा कास पठार कार्यकारी समितीने आनेक गावागावात सामाजिक विविध उपक्रम राबवतात. गावातील तरुण तरुणी महिला ग्रामस्थ यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.तसेच अधिक माहितीसाठी आपल्या www.kas.ind.in
संकेत स्थळावर माहीती उपलब्ध आहे.अश्या कासपठार कार्यकारी समितीने व वनविभागाने प्रथमच आपल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न केला. या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वनविभागाचे कर्मचारी व कार्यकारी समितीचे सदस्य व कर्मचारी यांनी वाढवली कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सहाय्यक वन क्षेत्रपाल. प्रदिप रौंदळ व निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल. निलेश राजपूत, वनपाल बामणोली. समाधान वाघमोडे सचिव,सुनिल शेलार वनरक्षक, तसेच कार्यकारी समितीचे प्रमुख मान्यवर दत्तात्रय किर्दत अध्यक्ष, प्रदिप कदम उपाध्यक्ष, विजय वेंदे, ज्ञानेश्वर आखाडे, रामचंद्र उंबरकर, दत्ताराम बादापुरे, पुष्पा चिकणे,
,कांचन किर्दत, सोमनाथ जाधव, बजरंग कदम, विष्णु किर्दत व कासपठार कार्यकारी समितीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

चौकट…
सोमनाथ बुधले (ऑफिस कर्मचारी ) यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून नव्याने कास पठार ची ओळख करून दिली आहे. या मध्ये कास पठार वरील फुलांची माहिती दिली आहे. फोटो च्या माध्यमातून समितीच्या कामाची व वर्षभराच्या कामांची व योजनांची माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी www.kas.ind.in
या संकेत स्थळावर माहीती मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button