*ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा झाला फौजी*
जावली करीअर अकॅडमीचे कार्य कौतुकास्पद
मेढा.दि.27 : – छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील श्री क्षेत्र मामुर्डी येथील ग्रामपंचायत सदस्या सविता सुनिल पांडुरंग धनावडे यांचा संकेत मुलगा . त्याचे वडील पिठाची गिरण चालवून तसेच गावोगावी जाऊन पिठाच्या गिरणीच्या जात्यांना टाकी देवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांचा मुलगा संकेत यांची सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड झाली आहे. अत्यंत कष्टातून त्यांने मिळविलेल्या या यशाबाबद्दल विविध स्तरातुन त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.
संकेत धनावडे हा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांला लहानपणापासून शेतीची आवड होती. तो घरातील गोठ्यातील शेण काढणेपासुन, जनावरांना लागणारी वैरण ( गवत ) कापुन, डोक्यावर घेवून आणणे. शेतातील पेरणीसह भात लागण करणे, भात काढणी,सर्व कामे करून तो सराव करायचा. फक्त सरकारी नोकरी मिळवायची जिद्द सुद्धा त्यांच्या मनात लहानपणापासून होती. तो कायम म्हणायचा,नोकरी केली तर सरकारी, नाहीतर विकायची तरकारी असा निश्चयच त्यांने केला होता. आपल्या कुटूंबियांना शेतीच्या प्रत्येक कामात मदत करण्यासोबतच जावळीची राजधानी मेढा जावली करिअर अकॅडमी येथे सुद्धा संकेत याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. यातूनच त्यांनी प्रचंड कष्ट घेत सरकारी नोकरी मिळवून सीमा सुरक्षा दलात यश मिळविले आहे. जावली करीअर अकॅडमी ने मामुर्डीचे फोजी महेश धनावडे, मुंबई पोलीस कुमारी काजल धनावडे, आणि फौजी संकेत धनावडे यांना घडवले मुळे तसेच त्यांच्या या यशाबद्दल, तालुक्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जावली करीअर अकॅडमीचे संस्थापक संतोष कदम व राजश्री कदम, तेजस शेलार सर ,कांबळे सर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रा. संतोष कदम, विष्णू धनावडे, बजरंग चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी कार्यक्रमासाठी, गांजे गावचे सुपुत्र सेवानिवृत फौजी देशमुख,शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, प्रशांत जुनघरे, सखाराम साळुंखे, सचिन शेलार, जगन्नाथ शिर्के,मामुर्डी गावचे सरपंच जगन्नाथ धनावडे, कविताताई धनावडे, संगीताताई धनावडे, अंकुश सपकाळ,दत्ता सपकळ, पत्रकार सुनिल आण्णा धनावडे,सेवानिवृत्त फौजी विष्णू सपकाळ, श्रीधर सपकाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई महानगरपालिका अधिकारी विष्णू धनावडे यांनी केले तर आभार अंकुश सपकाळ यांनी मानले.